Monday, 09 Mar, 4.16 pm अर्थसाक्षर

नवे लेख
म्युच्युअल फंड सहज सोप्या शब्दात - भाग २० (अंतिम भाग)

 • फॅक्टशीट म्हणजे एक रिपोर्ट असतो जो प्रत्येक म्युच्युअल फंड दर महिन्याला प्रकाशित करतात.

 • यामध्ये आदल्या महिन्यात झालेल्या कर्जरोखे आणि समभाग बाजारातील बदलाचा आढावा दिलेला असतो.

 • जिथे फंड मॅनेजर आपल्याला विदेशी तसेच भारतातील घडामोडींचे विश्लेषण करून त्याचा नजीकच्या काळात म्युच्युअल फंडावर काय परिणाम होईल त्याबद्दल माहिती देतो.

 • त्यानंतर फॅक्टशीटमध्ये सर्व योजनांची पूर्ण विस्तृत माहिती दिलेली असते, त्यात मूलभूत माहिती जसे कमीतकमी गुंतवणूक करायची रक्कम किती, योजनेचे गुंतवणूक उद्देश काय आहे, एन्ट्री आणि एक्झिट लोड काय आहे, योजनेमध्ये कोणती वेगवेगळे पर्याय आहेत, त्यांची आदल्या महिन्याच्या शेवटची मालमत्ता मूल्य (नाव) काय होती. त्याचबरोबर प्रत्येक योजनेच्या फंड मॅनेजरचे नाव व त्याची माहिती दिलेली असते.

 • म्युच्युअल फंडाच्या योजनेचा रीस्को मीटर हा एक योजनेचा महत्वाचा भाग आहे. सेबीने हे रीस्को मीटर अशासाठी बनवले आहेत की जेणेकरून गुंतवणूकदारांना त्या योजनेची बाजारातील जोखीम कोणत्या प्रकारची आहे त्याची माहिती मिळते त्यामुळे गुंतवणूकदार स्वतःच्या जोखीम घेण्याच्या क्षमतेनुसार योग्य त्या योजनेची निवड करू शकतो.

 • फॅक्टशीटमध्ये फंड मॅनेजरने गुंतवणूक केलेल्या सर्व कर्जरोखे व समभागाची पूर्ण माहिती दिलेली असते. त्याला योजनेचा गुंतवणूक पोर्टफोलिओ म्हणतात.

 • फंड मॅनेजरचा कारभार हा पूर्णपणे पारदर्शक असतो. सेबीने आखून दिलेल्या नियमानुसार फॅक्टशीटमध्ये योजनेची मागील कामगिरी जी वेगवेगळ्या कालावधीचा, अगदी योजना सुरु झाल्यापासूनचा दिलेला असतो ज्यावरून गुंतवणूकदारांना आपला गुंतवणुकीचा निर्णय घेणं सोपं जातं. इतरही बरीच माहिती ह्या फॅक्टशीटमध्ये दिलेली असते.

 • म्युच्युअल फंडाच्या वेबसाईटवर आपल्याला फॅक्टशीट पाहायला मिळू शकते.

 • (म्युच्युअल फंडातील गुंतवणूक ही बाजार जोखिमेचा अधीन असते. योजनेसंबंधित सर्व कागदपत्रे काळजीपूर्वक वाचा.)

  म्युच्युअल फंड सही है l

  धन्यवाद!

  -निलेश तावडे

  9324543832

  nilesh0630@gmail.com

  (लेखक हे म्युच्युअल फंड क्षेत्रात २० वर्षे कार्यरत होते. सध्या ते आर्थिक सल्लागार आहेत. त्यांना सम्पर्क करण्यासाठी तसेच, ९३२४५४३८३२ या क्रमांकावर व्हाट्स अँप करा. तसेच त्यांचे माहितीपर व्हिडीओ पाहण्यासाठी त्यांच्या YouTube Channel ला सबस्क्राईब करा. म्युच्युअल फंडातील गुंतवणूक चालू करण्यासाठी त्यांच्या www.nileshtawde.com या वेबसाईटला भेट द्या. आपल्या विभागात आपल्या मित्रपरिवाराकरिता म्युच्युअल फंड संबंधित मोफत मार्गदर्शन शिबीर आयोजित करा आणि अर्थसाक्षर अभियानामध्ये सामील व्हा.)

  Dailyhunt
  Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: ArthaSakshar
  Top