Friday, 18 Sep, 12.16 pm बहुजननामा

होम
2 मिनिटांच्या एक्सरसाईजने घटवले 13 KG वजन, जपानी फॉर्म्युलाची 'कमाल'

बहुजननामा ऑनलाईन
लठ्ठपणा शरीरात थायरॉयड, पीसीओडी आणि डायबिटीज सारखे भयंकर आजाराचे कारण ठरू शकतो. लठ्ठपणा तुमचा लूक बिघडवतो, शिवाय ब्लड डिसॉर्डर आणि हार्ट डिसीज (हृदय रोग) सुद्धा होऊ शकतात. जर तुम्हीसुद्धा वाढत्या वजनाने त्रस्त असाल तर नव्या जपानी तंत्राने चांगला उपाय होऊ शकतो.

हे जपानी तंत्र खुप पॉप्युलर होत आहे. या तंत्राद्वारे वेगाने बेली फॅट कमी करू शकता. जपानचा एक अ‍ॅक्टर माईक रयोस्केने हा फॉर्म्युला स्वतावर अजमावला आहे.

माईकचे म्हणणे आहे की, या तंत्राने त्याचे 13 किलोग्रॅम वजन कमी झाले. 4.7 इंच पोट कमी झाल्याचा दावाही त्याने केला आहे. हा केवळ दोन मिनिटांच्या एक्सरसाईजचा परिणाम आहे.

माईकने सांगितले की, या एक्सरसाईजद्वारे त्याचे वजन कमी झालेच, शिवाय पाठदुखीची समस्या दूर झाली.

अशी करा एक्सरसाईज

1 जमीनीवर एक पाय पुढे आणि एक पाय थोडा मागच्या बाजूला ठेवा. शरीराच्या मागील भागावर आणि पायांवर दाब टाका.

2 यानंतर हवेत वर हात उचलून 3 सेकंदपर्यंत संथ गतीने श्वास घ्या. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यावर वेगाने श्वास बाहेर काढा. श्वास सोडताना आपले हात घट्ट करत वरून खाली आणावे लागतील.

3 असे 2 ते 10 मिनिटांपर्यंत रोज केल्याने वजन वेगाने कमी होऊ लागेल. ही ब्रिदिंग एक्सरसाईज वजन घटवण्यासाठी खुप उपयोगी मानली गेली आहे. बॉडीचे फॅट ऑक्सीजन, कार्ब आणि हायड्रोजनपासून बनते.

जेव्हा आपण श्वास घेतो तेव्हा ऑक्सीजन फॅट सेल्सपर्यंत पोहचून पाणी आणि कार्बनमध्ये बदलतो. शरीरात जेवढा जास्त ऑक्सीजन असतो, तेवढे जास्त फॅट बर्न होते.

या फार्म्युलासोबत आहारावर सुद्धा नियंत्रण ठेवावे लागेल. शुगर ड्रिंक्स, व्हाइट ब्रेड, पास्ता आणि अल्कोहल ( प्रामुख्याने बीयर)चे सेवन बंद करा.

केळी, दही, फ्रेश फळे-भाज्या, बदाम, फॅटी फिश आणि लीन मीट वजन कमी करण्यात मदत करतील.

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: BahujanNama
Top