भोर : बहुजननामा ऑनलाईन – भोर शहर आणि तालुक्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे कोरोनाची साखळी तोडण्यासाठी प्रशासनाने आज शुक्रवार (दि. 7) पासून बुधवारी (दि. 12) रात्री 12 वाजेपर्यंत शहरात 6 दिवसांचा कडक लॉकडाऊन जाहीर केला आहे. या काळात शहरातील आरोग्यसेवा वगळता सर्व व्यवहार बंद ठेवण्यात येणार आहेत.
भोर तालुक्यातील नगरपालिका हद्दीत आणि ग्रामीण भागात ज्या गावात कोरोनाचा फैलाव झपाट्याने होत आहे. तसेच ज्या ठिकाणी सक्रिय रुग्णांची संख्या जास्त आहे. त्याठिकाणचा प्रसार रोखण्याच्या उद्देशाने भोर नगरपालिका क्षेत्रामध्ये शुक्रवारी (दि. 7) ते बुधवारी (दि.

