Sunday, 25 Aug, 7.17 am बहुजननामा

होम
धनंजय मुुंडेंनी पोलिसांना सुनावलं ; म्हणाले, जनतेची भिती आम्हाला नाही तर मुख्यमंत्र्यांना

बीड : बहुजननामा ऑनलाइन – धनंजय मुंडे यांनी सुरक्षा व्यवस्थेवरून पोलिसांना सुनावत म्हणाले कि, ‘शिवस्वराज्यच्या यात्रेमधील मावळ्यांना कोणाची भीती नाही. जनतेची भीती आम्हाला नाही ती भीती मुख्यमंत्र्यांना असेल. सभेला आलेल्या तरुणांना डी झोनमध्ये बसू द्या.’ भाजप पक्षाच्या महाजनदेश यात्रेप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेसची शिवस्वराज्य यात्रा आज, रविवारी माजलगाव येथे आली असता तरुणांची गर्दी झाली होती. मात्र, सुरक्षेचे कारण देत पोलिसांनी स्टेजजवळ तरुणांना जाण्यास रोखले होते.

राष्ट्रवादीच्या शिवस्वराज्य यात्रेच्या माजलगाव येथील सभेसाठी उभारण्यात आलेल्या मंडपात पोलिस सुरक्षेच्या कारणास्तव कार्यकर्त्यांना डी झोनमध्ये बसू दिले नाही. यावेळी कार्यकर्त्यांकडून पोलिसांबद्दल तीव्र रोष व्यक्त करण्यात आला. हा प्रकार धनंजय मुंडे यांच्या लक्षात येताच तरुणांना अडविणाऱ्या पोलिसांना समोर बोलावून चांगलेच खडसावले. कार्यकर्त्यांना डी झोन परिसरात बसू द्या, अशा सुचना दिल्या.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेत सुरक्षेच्या कारणावरून प्रत्येक ठिकाणी नागरिकांना स्थानबद्ध केले जात आहे. कै. धर्मा पाटील यांच्या ६९ वर्षीय पत्नीलाही स्थानबद्ध करण्यात आले. त्याचा संदर्भ घेत धनंजय मुंडे यांनी ‘जनतेची भीती तुमच्या मुख्यमंत्र्यांना असेल, आम्हाला नाही. आम्ही जनतेतील नेते आहोत, असे सुनावत सभेला येणाऱ्या एकाही माणसाला अडवू नका, अशा सूचना केल्या.

धनंजय मुंडेंचे जोरदार भाषण सुरु होते. त्याच वेळी अमोल कोल्हे शेजारी बसणाऱ्या अजित दादांनी धनंजय मुंडे यांच्या मुलीच्या पाठीवर हात ठेवत स्मित हास्य केली. पहिल्यांदाच परळीतील जाहीर कार्यक्रमात धनंजय मुंडेंचे कुटुंब देखील उपस्थित होते. यात आई, पत्नी आणि अडीच वर्षाची आदिश्री ही देखील हजर होती. सगळे लोक भाषणात टाळ्या वाजवत होते, हे पाहिल्यावर तिनंही छोट्या हातांनी टाळ्या वाजवल्या. तेव्हा सगळे तिच्याकडे पाहत होते.

शिवस्वराज्य यात्रेच्या दुसऱ्या टप्प्यामध्ये परळी शहरातील मोंढा मैदानावर झालेल्या सभेत मान्यवर स्टेजवर येण्याआगोदर राष्ट्रवादीच्या गाण्यावर आदिश्रीने डान्स करत आनंद लुटला. भाषण सुरु झाल्यावर देखीलआदिश्रीची मस्ती सुरूच होती. स्टेजवर आल्याबरोबर खा. कोल्हेंनी पहिल्यांदा तिच्याकडे हातवारे करत पाहिले. नंतर स्टेजवर दादाच्या शेजारी जाऊन बसली. यामुळे संपूर्ण परळीच्या सभेत धनंजय मुंडे यांच्या लेकीची चर्चा झाली.

धनंजय मुंडेंना तीन मुली आहेत. सर्वात लहान आदिश्री अवघ्या अडीच वर्षांची आहे. पहिल्यांदाच तिने वडिलांचे भाषण जाहीर कार्यक्रमात ऐकले. विधानसभेची निवडणूक जवळ आल्यामुळे आता मुंडे कुटुंबातील सर्वच जण कामाला लागले आहेत. यावेळी धनंजय मुंडेंनी परळीकरांना भावनिक आवाहन केले. मात्र, सर्वात जास्त चर्चा झाली ती त्यांची लेक आदिश्रीची.

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: BahujanNama
Top