Thursday, 01 Oct, 9.05 pm बहुजननामा

होम
एकाकीपणामुळं त्रस्त झालेल्यानं Facebook वर लावला स्वतःचा Sale, मुलींना म्हणाला - 'पहले इस्तेमाल करो, फिर विश्वास करो'

बहुजननामा ऑनलाईन- कोरोनामुळे लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे अनेक कपल्सचे आयुष्य प्रभावित झाले आहे. काहींना तर दूर रहावे लागले आहे. तसेच काही कपल्स लॉकडाऊनच्या काळात सोबत राहिले. यापैकी काहींचे नाते घट्ट झाले तर काही देशांमध्ये या कारणामुळे घटस्फोटाच्या प्रकरणांमध्ये वाढ झाली आहे. परंतु आज आपण अशा व्यक्तीबाबत जाणून घेणार आहोत ज्याचे लॉकडाऊनशी काहीही घेणे देणे नाही. हा व्यक्ती 30 वर्षाचा असून गेल्या 10 वर्षांपासून तो एकाही रिलेशनमध्ये राहिलेला नाही. आपल्या एकटेपणाला कंटाळून त्याने फेसबुकवर आपला सेल लावला आहे. सर्वात मनोरंजक बाब म्हणजे त्याने या सेलमध्ये त्याची किंमत आणि कंडिशन नमूद केल्या आहेत. दरम्यान पाहता पाहताच त्या व्यक्तीची ही पोस्ट व्हायरल झाली. एकीकडे लोक त्याची चेष्टा उडवत आहेत तर दुसरीकडे त्याला आशा आहे की आता त्याच्या आयुष्यात नक्कीच सुखाचे क्षण येतील.

दरम्यान फेसबुकवर स्वत:ला रिलेशनशिपसाठी सेलवर ठेवल्यानंतर आता त्याच्याकडे मुलींच्या ऑफरचा ढीग लागला आहे. हा व्यक्ती ऑनलाइन प्रेम शोधत होता आणि आशा आहे की लवकरच त्याचा शोध संपेल. 30 वर्षीय अ‍ॅलन क्लेटन गेली 10 वर्षांपासून सिंगल आहे. त्याने अनेक डेटिंग अ‍ॅप्स वापरले. पण त्याला कोणताही साथीदार सापडला नाही. यानंतर त्याने स्वत:ला सेलवर ठेवण्याचा निर्णय घेतला.

अ‍ॅलन हा यूके केटरिंगमध्ये राहत असून व्यवसायाने लॉरी ड्राईव्हर आहे. त्याने स्वत:ला फेसबुकवर विनामूल्य आणि चांगल्या कंडीशनमध्ये असल्याचे वर्णन केले. स्वत:ची विक्री करण्यास तयार असलेल्या अ‍ॅलनला या अ‍ॅडनंतर चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्याच्या पोस्टवर बर्‍याच मुलींनी त्याच्याबरोबर डेटवर जाण्याची इच्छा व्यक्त केली. अ‍ॅलनच्या म्हणण्यानुसार आतापर्यंत तो त्यापैकी एकीबरोबरच बाहेर गेला आहे आणि पुढे तो इतर मुलींबरोबरही जाण्याचा विचार करत आहे.

फेसबुकवर स्वतःला विकण्याचा विचार अ‍ॅलनला डेटिंग साइटवरून आला. अ‍ॅलनने सांगितले की त्याला डेटिंग साइटवर मॅच मिळत असे, पण प्रत्येक जण त्याला एकसारखाच प्रश्न विचारत असे. यामुळे तो अस्वस्थ व्हायचा. शेवटी त्याने विचार केला की स्वत: बद्दलची सर्व माहिती एकाच ठिकाणी देऊन स्वत:ला सेलवर ठेवावे. ज्याला रस असेल तो येईल. आणि अ‍ॅलनची आयडिया कामात आली.

अ‍ॅलनने आपल्या अ‍ॅडमध्ये लिहिले की, हे लेडीज, मी अ‍ॅलन, 30 वर्षांचा आहे. मी एक सुंदर स्त्री शोधत आहे जिच्याशी मी बोलू शकेल आणि तिच्यासोबत मी काही विवाहसोहळ्यांमध्ये जाऊ शकेल. तिथे मला एकटे जायचे नाही. त्याने आपल्या अ‍ॅडमध्ये स्वतःला सिंगल असल्याचे देखील लिहिले. अ‍ॅलनचा हा अंदाज मुलींना आवडला आणि आता त्याच्याकडे डेटवर जाण्यासाठी मुलींच्या रांगा लागल्या आहेत. बर्‍याच मुलांनी देखील अ‍ॅलनला शुभेच्छा दिल्या. त्याच वेळी, कित्येकांनी ही कल्पना एक उत्तम असल्याचे लिहिले आणि सिंगल्स लोकांसाठी एक जीवन बदलणारी कल्पना असल्याचे देखील सांगितले.

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: BahujanNama
Top