Monday, 01 Mar, 5.18 pm बहुजननामा

होम
Gold Price Today : खुशखबर ! आत्तापर्यंत 11 हजारांनी स्वस्त झालं सोनं; जाणून घ्या दर

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सोने-चांदीच्या दरात सातत्याने चढउतार पाहिला मिळत आहे. आत्तापर्यंत सोने तब्बल 11 हजारांनी स्वस्त झाले आहे. मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर एप्रिलचा फ्युचर ट्रेड 382 रुपयांच्या तेजीसह 46,118 रुपयांवर गेला आहे. याशिवाय चांदीचा मार्च फ्युचर ट्रेड 889 रुपयांच्या तेजीसह 68,150 रुपये झाला आहे. या बदलांमुळे सोने चांदीच्या दरात घसरण किंवा तेजी पाहिला मिळत आहे.

आंतरराष्ट्रीय बाजारात आज सोन्याचा दरात तेजी पाहिला मिळाली. अमेरिकेत सोनाचा बाजार 15.95 डॉलरच्या तेजीसह 1,750 डॉलर प्रतिऔंसवर बंद झाला. तर चांदीचा बाजार 0.21 डॉलर तेजीसह 26.89 डॉलरच्या स्तरावर आहे. दिल्ली सराफा बाजारात 7 ऑगस्ट 2020 मध्ये सोन्याचा दर 57,008 रुपये प्रति 10 ग्रॅम सर्वोच्च स्तरावर बंद झाला.

या पिवळ्या धातूच्या किंमतीत शुक्रवारी 26 फेब्रुवारी 2021 पर्यंत 11,409 रुपयांची घसरण झाली. तर चांदी 7 ऑगस्ट 2020 ला 77,840 रुपये प्रति किलोवर पोहोचली होती. पण गेल्या शुक्रवारी 10,421 रुपयांनी कपात होऊन हा दर 67,419 रुपयांवर पोहोचला आहे.

2021 मध्ये वाढणार दर?
सोन्याच्या दरात 2021 मध्ये वाढ होणार असल्याचे निश्चित आहे, असे अभ्यासकांचा अंदाज आहे. याशिवाय सोन्याची किंमतीत पुन्हा एकदा वाढ सुरु होणार आहे. 62,000 रुपये प्रति 10 ग्रॅम वर सोने जाईल, अशी शक्यता आहे.

दिल्लीतील सराफा बाजारात भाव काय?
– 22 कॅरेट सोने – 44810 रुपये प्रति 10 ग्रॅम

– 24 कॅरेट सोने – 48910 रुपये प्रति 10 ग्रॅम

– चांदीचे दर – 67510 रुपये प्रति किलो.

पुण्यातील सराफा बाजारात भाव काय?
– 22 कॅरेट सोने – 44940 रुपये प्रति 10 ग्रॅम

– 24 कॅरेट सोने – 45940 रुपये प्रति 10 ग्रॅम

– चांदीचे दर – 73,300 रुपये प्रति किलो.

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: BahujanNama
Top