Thursday, 08 Apr, 2.15 pm बहुजननामा

होम
मनसेचे शिवसेना नेते अनिल परब यांच्यावर टीकास्त्र, म्हणाले - 'Master Stroke to Master mind हा प्रवास थक्क करणारा'

मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – अंबानी स्फोटकं प्रकरण आणि मनसुख हिरेन हत्याप्रकरणी NIA ने अटक केलेल्या सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन वाझेंची कसून चौकशी सुरु आहे. तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुखांनी आपल्याकडे 2 कोटींची मागणी केली होती. तसेच परिवहन मंत्री आणि शिवसेना नेते अनिल परब यांनी कंत्राटदारांकडून 50 कोटींची वसुली करण्यास सांगितल्याचा खळबळजनक आरोप वाझेंनी आपल्या पत्रात केला आहे. यावरून मनसे नेते संदीप देशपांडे यांनी अनिल परब यांच्यावर टीकास्त्र सोडलं आहे. मास्टर स्ट्रोक ते मास्टर माइंड हा प्रवास थक्क करणारा आहे, असा खोचक टोला देशपांडे यांनी लगावला आहे. या पूर्वीही देशपांडे यांनी ठाकरे सरकारवर विविध मुद्द्यांवरून टीकास्त्र सोडले होते.

देशपांडे यांनी एक ट्विट करत अनिल परब यांच्यावर निशाणा साधला आहे. मास्टर स्ट्रोक ते मास्टर माइंड हा प्रवास थक्क करणारा आहे. Advocate साहेब शपथेवर खोट बोलण हा गुन्हा आहे. हे आपल्याला माहित असेल ही अपेक्षा असल्याचे देशपांडे यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे. तसेच भाजपनेही अनिल परब यांच्यावर हल्लाबोल केला आहे. ओ परिवार मंत्री.. शपथ काय घेता.. शेंबूड पुसा.. राजीनामा द्या आणि चौकशीला सामोरे जा.. पुरावे तयार आहेतय आता वस्त्रहरण अटळ आहे.

असे म्हणत मला शहरातील सर्वांत एलिजिबल आणि उच्चशिक्षित बॅचलरकडून अजूनही मानहानीची नोटीस येणार का? आतुरतेने वाट पाहत आहे. वकील साहेबांची तर काल लागली. आता नोटीस कोण बनवणार? अशी खोचक विचारणा भाजपा नेते नितेश राणे यांनी ट्विटवरून केली आहे. दरम्यान परब यांनी वाझेंनी केलेले सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. दोन मुलींची शपथ घेतो, बाळासाहेबांची शपथ घेऊन सांगतो, माझ्यावरील आरोप खोटे आहेत. मला बदनाम करण्याचा हा प्रयत्न असल्याचे म्हटले आहे.

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: BahujanNama
Top