Friday, 18 Sep, 12.57 pm बहुजननामा

होम
रशियाची 'कोरोना' लस दिल्यानंतर 7 मध्ये एका स्वयंसेवकास 'साईड इफेक्ट', भारतात येणार आहेत कोटयावधी 'डोस'

बहुजननामा ऑनलाइन – रशियाची कोरोना व्हायरस वॅक्सीन स्पुतनिकबाबत पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित झाला आहे. वॅक्सीन घेणार्‍या प्रत्येक सातपैकी एक व्हॉलिंटियरमध्ये याचे साईड इफेक्ट दिसून येत आहेत. हा खुलासा स्वता रशियाचे आरोग्य मंत्री मिखाईल मुराश्को यांनी केला आहे. मुराश्को यांनी मॉस्को टाइम्सला दिलेल्या एका वक्तव्यात म्हटले की, वॅक्सीन घेणार्‍या सुमारे 14 टक्के लोकांमध्ये साईड इफेक्ट आढळले आहेत.

मॉस्को टाइम्सने आरोग्य मंत्र्यांच्या संदर्भाने म्हटले आहे की, प्रत्येक सातपैकी एक व्यक्तीने कोरोना व्हायरसची वॅक्सीन घेतल्यानंतर थकवा आणि मांसपेशींमध्ये वेदना यारखे साईड इफेक्ट होत असल्याची तक्रार केली. मात्र, मुराश्को यांचे म्हणणे आहे की, या साईड इफेक्टच्या प्रकाराची अगोदरच माहिती होती आणि ते पुढील दिवशी बरे झाले होते.

या वॅक्सीनच्या क्लिनिकल ट्रायलचे सुरूवातीचे निकाल 4 सप्टेंबरला द लँसेट जर्नलमध्ये प्रकाशित केले होते. 76 लोकांना ही वॅक्सीन दोन भागात देण्यात आली होती. परिणामांमध्ये आढळले की, स्पूतनिक पूर्णपणे सुरक्षित आहे आणि 21 दिवसांत व्हॉलिंटियर्सच्या शरीरात यामुळे कोणत्याही गंभीर साईड इफेक्टशिवाय अँटीबॉडी तयार झाली आहे.

मात्र, 'द लँसेट' मध्ये वॅक्सीनच्या साईड इफेक्टबाबत सुद्धा सांगण्यात आले होते. त्यानुसार, साईड इफेक्टमध्ये 58 टक्के लोकांनी इंजेक्शन दिलेल्या ठिकाणी वेदनांची तक्रार केली होती. तर 50 टक्के लोकांनी जास्त ताप, 42 टक्के लोकांनी डोकेदुखी, 28 टक्के लोकांनी कमजोरी आणि 24 टक्के लोकांनी मांसपेशींच्या वेदनांची तक्रार केली होती.

लँसेटमध्ये प्रसिद्ध अभ्यासात म्हटले आहे की, वॅक्सीन घेतल्यानंतर 42 दिवसांच्या आत व्हॉलिंटियरमध्ये खुप किरकोळ लक्षणे दिसली अणि गंभीर साईड इफेक्ट आढळले नाहीत. स्टडीच्या लेखकांचे म्हणणे आहे की, असे साईड इफेक्ट प्रत्येक वॅक्सीननंतर आढळतात.

भारतातील लोकांसाठी सुद्धा रशियन वॅक्सीनबाबत चर्चा सुरू आहे. काही दिवसांपूर्वी रशियन डायरेक्ट इन्वेस्टमेंट फंडने भारतीय कंपनी डॉक्टर रेड्डीला 10 कोटी वॅक्सीन डोस देण्याच्या करारावर स्वाक्षरी केली आहे.

वॅक्सीन सप्लायची ही प्रक्रिया ट्रायल पूर्ण झाल्यानंतर वर्षाच्या अखेरपर्यंत सुरू केली जाईल. या वॅक्सीनला मंजूरी देण्यापूर्वी भारतात सुद्धा लोकांवर तिची क्लिनिकल ट्रायल केली जाईल.

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: BahujanNama
Top