Monday, 11 Jan, 1.08 pm बहुजननामा

होम
शिकागोमध्ये माथेफिरू बंदूकधार्‍याने लोकांवर केला गोळीबार, 7 जणांना घातल्या गोळ्या, 3 ठार

बहुजननामा ऑनलाइन टीम – अमेरिकेतून एक खळबळजनक घटना(Chicago) समोर आली आहे. येथे शिकागोच्या दक्षिणेकडील भागाकडून गोळीबार सुरू करणार्‍या एका व्यक्तीने तीन जणांची हत्या केली असून चार जण जखमी केले आहे. दरम्यान पोलिसांनी हल्लेखोरालाही ठार केले आहे. शहरातील उत्तरेकडील भागातील पार्किंगमध्ये त्याला मारण्यात आले. दरम्यान या हल्ल्यामागील त्याचा हेतू काय होता हे अद्याप समजू शकलेले नाही. शिकागोचे पोलिस अधीक्षक डेव्हिड ब्राऊन यांनी सांगितले, शनिवारी दुपारी हा गोळीबार सुरू झाला.

बंदूकधार्‍याने शिकागो विद्यापीठातील 30 वर्षीय विद्यार्थ्याला डोक्यात गोळी घातली. घटनेच्या वेळी तो हायड पार्क परिसरातील पार्किंग गॅरेजमध्ये कारमध्ये बसला होता. यानंतर, 32 वर्षीय बंदूकधारी जेसन नाइटिंगल एका अपार्टमेंटमध्ये गेला आणि तिथे वर्षीय सुरक्षा रक्षकाला गोळी मारली, जो आपल्या डेस्कवर बसला होता. यानंतर त्याने तेथे एका 77 वर्षीय महिलेलाही गोळी घातली. महिलेची प्रकृती चिंताजनक असून गार्डला रुग्णालयात मृत घोषित करण्यात आले.

कार हिसकावली, पोलिसांवर केला गोळीबार
यानंतर त्याने बंदुकीच्या आधारे ओळखीच्या एका व्यक्तीची कार हिसकावली आणि एका दुकानात जाऊन तेथे गोळीबार केला. यात एका 20 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला आणि 81 वर्षीय महिला जखमी झाली. महिलेची प्रकृती चिंताजनक आहे. बंदूकधार्‍याने दुकानाच्या बाहेर कारमध्ये बसलेल्या 15 वर्षीय मुलीला गोळी घातली. मुलीची आईही त्याच्यासोबत होती. त्याची प्रकृती चिंताजनक आहे. यानंतर हल्लेखोर पुन्हा त्याच दुकानात गेला, तेथे अधिकारी यापूर्वी झालेल्या गोळीबाराचा तपास करीत होते, त्याने अधिका-यांवर गोळीबार केला. मात्र, कोणताही अधिकारी जखमी झाला नाही.

दुसर्‍या भागात जाऊन हल्ला
हल्लेखोर येथेच थांबला नाही, त्याने गाडी इव्हस्टोनच्या दिशेने नेली. हे शिकागोच्या सीमेवर आहे. इव्हस्टोनचे पोलिस प्रमुख डेमिट्राउस कुक म्हणाले की, येथील पोलिसांनाही दुकानात गोळीबार झाल्याची माहिती मिळाली. वास्तविक, हल्लेखोर त्या दुकानात गेला आणि त्याला लुटण्याची धमकी देत गोळ्या झाडल्या पण तिथे कुणालाही गोळी लागलेली नाही. हल्लेखोर इथून आयएचओपी रेस्टॉरंटमध्येही गेला, जिथे त्याने एका महिलेच्या डोक्यात गोळी झाडली. तिची प्रकृती चिंताजनक आहे. रेस्टॉरंटमधून बाहेर पडल्यानंतर अधिका-यांनी त्याला पार्किंग क्षेत्रात घेरले, जेथे पोलिसांशी झालेल्या चकमकीत तो ठार झाला.

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: BahujanNama
Top