Wednesday, 27 Jan, 6.41 pm बहुजननामा

होम
Video : जेव्हा 'द ग्रेट खली'सोबत WWE च्या रिंगमध्ये उतरली सपना चौधरी आणि अर्शी खान ! एकाच गाण्यावर धरला ठेका

बहुजननामा ऑनलाइन टीम – अभिनेत्री, सिंगर, एक्स बिग बॉस (Bigg Boss) स्पर्धक, स्टार डान्सर सपना चौधरी (Sapna Choudhary) आणि अ‍ॅक्ट्रेस अर्शी खान (Arshi Khan) एका व्हिडीओमुळं चर्चेत आले आहेत. यात सपना आणि अर्शी WWE च्या रिंगमध्ये द ग्रेट खली सोबत डान्स करताना दिसत आहेत. सपना आणि अर्शी दोघीही बिग बॉस 11 मध्ये दिसल्या आहेत. सध्या त्यांचा खली सोबतचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होताना दिसत आहे.

सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ चर्चेत आहे. यात दिसत आहे की, रींगमध्ये द ग्रेट खली आहे. व्हिडीओत सपना आणि अर्शी खानही दिसत आहेत. बिग बॉसमधून बाहेर आल्यानंतर दोघींची चांगली मैत्री झाली होती. व्हिडीओत त्या खली सोबत थिरकताना दिसत आहे.

तसं पाहिलं तर हा व्हिडीओ नवीन नाीहीये, तर जुनाच आहे. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होताना दिसत आहे. अनेकांनी यावर कमेंट करत प्रतिक्रिाया देखील दिल्या आहेत.

अर्शीच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं तर ती बिग बॉस 11 मध्ये झळकल्यानंतर आता पुन्हा एकदा ती बिग बॉस 14 मध्ये दिसत आहे.

सपनाच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं झालं तर डान्सर सपना चौधरीनं दोस्ती के साईड इफेक्ट्स मधून बॉलिवूडमध्ये डेब्यू केला होता. सपना बिग बॉस 11 या रिअ‍ॅलिटी शोमध्येही झळकली आहे. यानंतर तिला भोजपुरी सिनेमात काम मिळालं होतं. बैरी कंगना हे तिचं स्पेशल नंबर खूप गाजलं. यानंतर तिनं पंजाबी सिनेमात स्पेशल साँग केलं आहे. आता लवकरच ती लोरी सिनेमात काम करताना दिसणार आहे. सपनाला भोजपुरी इंडस्ट्रीतील सुपरस्टार दिनेश लाल यादव उर्फ निरहुआ याच्या सोबत एका सिनेमात प्रमुख भूमिका साकारण्याची संधी मिळाली आहे.

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: BahujanNama
Top