Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
'आईसोबतच प्रत्येक कर्तृत्ववान महिलेच्या सन्मानासाठी उभा', काँग्रेसच्या टिप्पणीवर जय पवार संतप्त

'आईसोबतच प्रत्येक कर्तृत्ववान महिलेच्या सन्मानासाठी उभा', काँग्रेसच्या टिप्पणीवर जय पवार संतप्त

बखर Live 1 week ago

मुंबई: उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुनेत्रा पवार यांच्याविषयी काँग्रेसच्या सोशल मीडिया खात्यावरून करण्यात आलेल्या 'गुंगी गुडिया' या कथित आक्षेपार्ह टिप्पणीवरून राज्यातील राजकीय वातावरण तापले आहे.

या प्रकरणी काँग्रेस नेते हर्षवर्धन सपकाळ यांची पक्षातून हकालपट्टी करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाने केली आहे. Jay Pawar

या वादावर आता सुनेत्रा पवार यांचे धाकटे पुत्र जय पवार यांनीही प्रतिक्रिया दिली असून, महिलांचा अवमान करणारी भाषा कोणत्याही सुसंस्कृत लोकशाहीत स्वीकारली जाऊ शकत नाही, अशी ठाम भूमिका त्यांनी मांडली आहे.

Sunetra Pawar: सुनेत्रा पवारांवरील वक्तव्याचे तीव्र पडसाद; बारामतीत पृथ्वीराज चव्हाणांच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन!

सोशल मीडियावरील पोस्टमध्ये जय पवार यांनी म्हटले की, सुनेत्रा पवार यांच्याबाबत काँग्रेस नेत्यांनी वापरलेली भाषा ही केवळ एका व्यक्तीवरील टीका नाही. निष्ठा, कठोर परिश्रम, जनसेवा आणि स्वतःच्या कर्तृत्वाच्या जोरावर समाजात स्थान निर्माण करणाऱ्या प्रत्येक महिलेच्या सन्मानावर हा थेट आणि निषेधार्ह आघात आहे.

सुनेत्रा पवार या महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री आहेत. राजकीय मतभेद असू शकतात, मात्र महिलांचा सन्मान, प्रतिष्ठा आणि व्यक्तिमत्त्व कमी लेखणारी भाषा कोणत्याही परिस्थितीत मान्य होऊ शकत नाही, असे जय पवार यांनी नमूद केले.

राजकारण हे विचार, धोरणे, कामगिरी आणि जनतेच्या विश्वासावर आधारित असले पाहिजे. महिलांचा अवमान करणाऱ्या शब्दांना त्यात स्थान नसावे. मतभेद तथ्य, सभ्यता, संयम आणि लोकशाही मूल्यांच्या चौकटीत मांडले गेले पाहिजेत, असेही त्यांनी म्हटले.

"आज मी केवळ माझ्या आईच्या पाठीशी उभा नाही, तर स्वतःच्या कर्तृत्वाने आपली ओळख निर्माण करणाऱ्या भारतातील प्रत्येक महिलेच्या सन्मानाच्या रक्षणासाठी ठामपणे उभा आहे. तिची राजकीय विचारधारा कोणतीही असो, तिचा सन्मान अबाधित राहिला पाहिजे," अशी भूमिका जय पवार यांनी व्यक्त केली.

महत्त्वाच्या बातम्या

विशेष प्रतिनिधी
Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: bakhar Live