Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story

आझाद मैदान पोलिसांनी मनोज जरांगे यांच्या आंदोलनाला परवानगी नाकारली

बखर Live 6 days ago

मुंबई: मराठा आंदोलन मनोज जरांगे पाटील यांनी 19 सप्टेंबरला मुंबईतील आझाद मैदानावर आमरण उपोषण करण्यासाठी परवानगी मागितली होती. आंदोलन शांततेच्या मार्गाने आणि पोलिसांनी घातलेल्या सर्व अटी-शर्तींचे पालन करून करण्याचे हमीपत्रही देण्यात आले होते.

मात्र, आझाद मैदान पोलिसांनी ही परवानगी नाकारली आहे. Manoj Jarang

दक्षिण मुंबईतील शाळा, रुग्णालये, व्यवसाय, न्यायालयीन कामकाज, सार्वजनिक वाहतूक आणि आरोग्य व्यवस्थेवर परिणाम होऊन सार्वजनिक सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न निर्माण होण्याची शक्यता असल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे. याशिवाय गणेशोत्सवाच्या काळात मुंबईत मोठी गर्दी असते आणि सुरक्षेच्या दृष्टीने पोलिसांवर अतिरिक्त जबाबदारी असते. यापूर्वीच्या जरांगे आंदोलनादरम्यान मोठ्या संख्येने आंदोलक मुंबईच्या रस्त्यावर उतरल्याने वाहतुकीवर परिणाम आणि कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्याचा दाखलाही पोलिसांनी दिला आहे. त्यामुळे यावेळी आझाद मैदानातील आंदोलनाला परवानगी नाकारण्यात आली आहे.

Sunetra Pawar : सुनेत्रा पवारांचा मोठा निर्णय ; पुणे जिल्ह्यातील 'ZP' शाळांमध्ये येणार डिजिटल सुविधा

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी 15 सप्टेंबरपासून 'मुंबई चलो' आंदोलनाची हाक देणारे मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा राज्य सरकार आणि मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर जोरदार हल्ला चढवला आहे. सरकारला गोरगरिबांची अजिबात कदर नाही. आम्ही सरकारला तब्बल 3 वर्षे संधी दिली. आता काय व्हायचे ते मुंबईतच होणार, आम्हाला जेलमध्ये टाकले तरी चालेल, पण हे आंदोलन आता थांबणार नाही, असा इशारा जरांगे पाटील यांनी दिला.

जरांगे म्हणाले, "बावनकुळे तुम्ही सावध राहा, ते बाईच्या पदराआडून डाव टाकत आहेत. प्रसाद लाड यांच्यामुळे बावनकुळे तुम्हाला सोडले होते. एरवी शेतकरी गेल्यावर 'सुट्टी आहे' सांगणारे अधिकारी आता शनिवारी-रविवारीही काम करू लागले आहेत. आंदोलनाच्या काळातच या चौकशा का सुरू झाल्या, हे संपूर्ण महाराष्ट्राला कळत आहे. सहकाऱ्यांवरील चौकशीच्या ससेमिऱ्याबाबत बोलताना ते म्हणाले की, "तुम्ही कितीही चौकशा करा, मला काही फरक पडत नाही. मी सहकाऱ्यांना आधीच सांगितले होते की तुमच्या मागे चौकशा लागतील, भीती वाटत असेल तर मला सोडा; पण ते सोबत राहिले. मला आणि माझ्या सहकाऱ्यांना माझा समाज तुकडे घालेल, सांभाळून घेईल."

महत्त्वाच्या बातम्या

विशेष प्रतिनिधी
Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: bakhar Live