Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
आजोबा शरद पवार यांच्या पाया पडून जय पवारांनी घेतले आशीर्वाद

आजोबा शरद पवार यांच्या पाया पडून जय पवारांनी घेतले आशीर्वाद

बखर Live 3 weeks ago

बारामती : विद्या प्रतिष्ठानच्या ५४ व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमासाठी बारामती एमआयडीसी परिसरात आलेले माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार गाडीतून उतरताच युवा नेते जय पवार यांनी त्यांच्याकडे धाव घेतली.

जय पवार यांनी आजोबा शरद पवार यांच्या पाया पडून आशीर्वाद घेतले. यावेळी शरद पवार यांनीही जय पवार यांच्या पाठीवर थाप मारत त्यांना आशीर्वाद दिले.

शुक्रवारी (ता. 16) विद्या प्रतिष्ठानच्या वर्धापन दिनानिमित्त शरद पवार यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. या कार्यक्रमाला खासदार सुप्रिया सुळे यांच्या कन्या रेवती सुळे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. दरम्यान, जय पवार आणि रेवती सुळे यांची विद्या प्रतिष्ठानच्या विश्वस्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

विद्या प्रतिष्ठानच्या वर्धापन दिनानिमित्त संस्थेच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. रेवती सुळे व जय पवार यांची विश्वस्त पदी निवड झाल्यानंतर ते आता इथून पुढे विद्या प्रतिष्ठानच्या कामकाजात सहभागी होतील. तत्पूर्वी जेष्ठ नेते शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन होणाऱ्या प्रेरणा स्थळाची पाहणी केली.

महत्त्वाच्या बातम्या

विशेष प्रतिनिधी
Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: bakhar Live