Dailyhunt
असा पराभव करू की काँग्रेसला  तोंड दाखवायला जागा राहणार नाही ; चंद्रशेखर बावनकुळे यांचा इशारा

असा पराभव करू की काँग्रेसला तोंड दाखवायला जागा राहणार नाही ; चंद्रशेखर बावनकुळे यांचा इशारा

बखर Live 1 week ago

पुणे : बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसचा आतापर्यंत कधीही न झालेला पराभव करू. काँग्रेसला तोंड दाखवायलाही जागा उरणार नाही, असा इशारा भाजप नेते आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिला.

बारामती पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने जोरदार तयारी सुरू केली असून काँग्रेसला मोठा धक्का देण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला आहे.

बावनकुळे म्हणाले, बारामतीमध्ये सुनेत्रा पवार यांचा उमेदवारी अर्ज भरला जाणार असून त्यांच्या विजयासाठी पक्ष पूर्ण ताकदीने मैदानात उतरणार आहे. बारामतीत 75 टक्क्यांहून अधिक मतांनी विजय मिळवण्याचा आमचा संकल्प आहे. काँग्रेसने निवडणूक लढवावी त्यांची इच्छा असेल तर लढावे. काँग्रेसला मी आवाहन करतो की, अजित पवार यांच्या यांच्या दीर्घ राजकीय प्रवासाचा विचार करावा, अजितदादांचा काँग्रेससोबत मोठा सहवास राहिला आहे. त्यामुळे काँग्रेसने बारामतीत निवडणूक लढवू नये आणि सुनेत्रा पवारांच्या पाठीशी उभे राहावे अशी विनंती मी करतो.

दरम्यान, ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी माघार घेतली आहे. काॅंग्रेसचे उमेदवार आकाश मोरे देखील माघारीसाठी अटींसह तयार आहेत.

राज्य सरकारने जर दिवंगत नेते अजित पवार यांच्या विमान अपघाताप्रकरणी गुन्हा दाखल केला, तरच मी माझी उमेदवारी मागे घेण्याचा पुनर्विचार करेन, अशी घोषणा काँग्रेसचे उमेदवार अ‍ॅड. आकाश मोरे यांनी केली आहे.

अजित पवार यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या या जागेवर निवडणूक बिनविरोध व्हावी, यासाठी सुनेत्रा पवार यांनी मोठे प्रयत्न केले होते. मात्र, काँग्रेसने शेवटच्या क्षणी माजी आमदार विजय मोरे यांचे पुत्र आकाश मोरे यांना मैदानात उतरवले.

विशेष प्रतिनिधी

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: bakhar Live