पुणे: मुळशी तालुक्यातील म्हाळुंगे गावातील रखडलेल्या विकासकामांवरून ग्रामस्थांनी गुरुवारी (दि. ३० जुलै) सकाळी आंदोलन करत प्रशासनाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली. म्हाळुंगेच्या माजी सरपंच रेखा पाडळे यांच्या नेतृत्वात हे आंदोलन सुरू होते.
यावेळी राष्ट्रवादीचे नगरसेवक बाबुराव चांदेरे यांनी धमकी दिल्याचा आरोप रेखा पाडळे यांनी केला आहे. (Baburao Chandere)
Rohit Tilak: शाहांच्या दौऱ्यावरून रणकंदन; संजय राऊतांना रोहित टिळकांनी खडसावले !
काय म्हणाल्या रेखा पाडळे?
रेखा पाडळे म्हणाल्या, 'आमच्या गावतील रस्त्याची विकासकामे रखडल्याने ग्रामस्थांसोबत आंदोलन सुरू होते. याबाबत महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनाही एक निवेदन देण्यात येणार होते. मात्र, आंदोलन सुरू असतानाच नगरसेवक बाबुराव चांदेरे आले आणि अचानक धमकी देण्यास सुरूवात केली.
चांदेरे यांनी आधी तुम्ही कुठे होता, 'मी तुम्हाला बघून घेईल अशा भाषेत मला आणि माझ्या मुलाला दम दिल्याचा आरोप पाडळे यांनी केला. 'मी सरपंच राहिलेली आहे, पण, जर नगरसेवक येऊन आताच धमकी देत असेल पुढे आणखी काय काय करेल, असे त्या म्हणाल्या.
आंदोलनकर्त्यांचे आरोप
म्हाळुंगेच्या नागिरकांनी आरोप केला की, गावातील रस्त्याची कामे रखडलेली आहेत. ठिकठिकाणी असलेल्या खड्ड्यांमुळे वारंवार अपघातांचे सत्र वाढले असून प्रशासन मूलभूत सुविधांकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप नागरिकांनी केला. या आंदोलनावेळी पुणे मनपाचे अधिकारी आंबेकर आणि चाबुकस्वारही उपस्थित होते.
यावेळी नागरिकांनी अधिकाऱ्यांसमोर आपल्या समस्या मांडत असतानाचा चांदेरे संतप्त झाले. त्यांनी आंदोलनकर्त्यांशी वाद घालायला सुरूवात केली. नागरिकांना 'मी तुम्हाला बघुन घेईल', 'मी बोलायला लागलो तर पळून जाल' अशी धमकी दिली. यावेळी पालिका अधिकाऱ्यांनी नागरिकांचे म्हणणे न ऐकता आंदोलन स्थळावरुन पळ काढल्याचा आरोपही ग्रामस्थांनी केला आहे.

