Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
बलात्कार, ब्लकमेल आणि इस्लाम धर्म स्वीकारण्यासाठी दबाव, नाशिक प्रकरणातील पीडितेचा चार वर्षे लैंगिक छळ

बलात्कार, ब्लकमेल आणि इस्लाम धर्म स्वीकारण्यासाठी दबाव, नाशिक प्रकरणातील पीडितेचा चार वर्षे लैंगिक छळ

बखर Live 1 month ago

नाशिक : खाजगी फोटोंचा वापर करून ब्लॅकमेल करत धर्मांतर करण्यासाठी दबाव आणला गेला. हिंदू धर्म आणि इस्लाममध्ये फरक दाखवत आणि आपला धर्म श्रेष्ठ असल्याचे सिद्ध करण्याचा प्रयत्न केला. हिंदू चालीरीती आणि श्रद्धांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आणि तिला इस्लाम धर्म स्वीकारण्यासाठी दबाव आणला गेल्याचा धक्कादायक आरोप नाशिक टीसीएस बीपीओ प्रकरणातील पीडितेने केला आहे.

पीडितेच्या म्हणण्यानुसार, ती दानिश शेखला जानेवारी 2022 मध्ये भेटली होती. ते दोघेही एकाच कॉलेजमध्ये शिकत होते, त्यामुळे त्यांची लवकरच मैत्री झाली. दानिश कामाच्या निमित्ताने तिला वारंवार भेटायला यायचा आणि त्यांच्यातील संभाषण हळूहळू वाढत गेले. याच काळात, दानिशने एका कंपनीत इंजिनिअर असल्याचे भासवून पीडितेला नोकरी मिळवून देण्याचे आश्वासन दिले. या आश्वासनामुळे पीडितेचा त्याच्यावर विश्वास बसला आणि ते दोघे अधिक जवळ आले.दानिशने पीडितेला भेटणे आणि तिचा विश्वास संपादन करणे सुरूच ठेवले. आपले शिक्षण पूर्ण झाल्यावर, दानिशच्या सल्ल्यानुसार पीडितेने एका बहुराष्ट्रीय कंपनीत मुलाखत दिली आणि तिची निवड झाली. दानिशसुद्धा त्याच कंपनीत काम करत असल्यामुळे, त्यांचे संवाद आणि संपर्क सुरूच राहिले. याच काळात दानिशचे मित्र, तोसिफ अख्तर आणि निदा खान, हेदेखील त्यांच्यात सामील झाले आणि ते अनेकदा कॅन्टीनमध्ये किंवा बाहेर एकत्र वेळ घालवत असत.

पीडितेच्या म्हणण्यानुसार, याच काळात धर्माबद्दल चर्चा सुरू झाली. दानिश आणि तोसिफ अनेकदा हिंदू धर्म आणि इस्लाममध्ये फरक दाखवत आणि आपला धर्म श्रेष्ठ असल्याचे सिद्ध करण्याचा प्रयत्न करत. त्यांनी हिंदू चालीरीती आणि श्रद्धांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आणि तिला इस्लाम धर्म स्वीकारण्यासाठी पटवून देण्याचा प्रयत्न केला.

पीडितेने आरोप केला आहे की, ऑगस्ट 2024 मध्ये, दानिश तिला आपल्या बाईकवरून फिरवण्याच्या बहाण्याने एका हॉटेलमध्ये घेऊन गेला. तिथे त्याने तिच्याशी जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले. जेव्हा दानिशचा मित्र, तोसिफ याला हे कळले त्याने नात्याचा गैरफायदा घेतला आणि तिला ब्लॅकमेल करण्यास व त्याच्यासोबत लैंगिक संबंध ठेवण्यासाठी दबाव आणण्यास सुरुवात केली.

पीडितेच्या म्हणण्यानुसार, जेव्हा तिने तोसिफच्या मागण्या नाकारल्या, तेव्हा त्याने तिच्या कुटुंबाला या संबंधांबद्दल सांगण्याची धमकी दिली. याबाबत कोणालाही न सांगण्यासाठी वारंवार दबाव आणण्याचा प्रयत्न केला. ऑफिसमध्येही तोसिफ तिचे कंबर आणि कमरेखालचा भाग पकडायचा. तिला पाहून अश्लील हावभाव करायचा, ज्यामुळे तिला अत्यंत अस्वस्थ आणि लाजिरवाणे वाटायचे.

दानिश आणि तोसिफ तिच्यावर इस्लाम धर्म स्वीकारण्यासाठी सतत दबाव टाकत होते. ते हिंदू धर्माविरुद्ध बोलत आणि तिला इस्लाम धर्म स्वीकारण्यास भाग पाडत होते. तिने ऐकले नाही, तर तिचे खाजगी फोटो सोशल मीडियावर प्रसिद्ध करण्याची धमकी त्यांनी दिली. या भीतीमुळे आणि दबावामुळे पीडितेला तीव्र मानसिक त्रासाला सामोरे जावे लागले.

फेब्रुवारी 2026 मध्ये एका महिलेने पीडितेला मेसेज केला. ती दानिश शेखची पत्नी असून तिला दोन मुले आहेत, असे सांगितले. हे ऐकून पीडितेला धक्का बसला, कारण दानिशने आपण अविवाहित असल्याचा दावा केला होता. जेव्हा तिने त्याला याबद्दल विचारले, तेव्हा त्याने या गोष्टी खोट्या असल्याचं म्हणत महिलेने सांगितलेल्या गोष्टी नाकारल्या.

जुलै 2022 ते फेब्रुवारी 2026 दरम्यान तिची वारंवार फसवणूक झाली. दानिशने आपले लग्न लपवून, तिला खोटी आश्वासने देऊन आमिष दाखवले आणि विविध ठिकाणी तिच्यावर वारंवार जबरदस्ती केली. त्याच वेळी, तोसिफने कार्यालयात तिचा वारंवार विनयभंग केला आणि तिच्यावर जबरदस्ती केली. या घटनांमुळे ती मानसिक आणि भावनिकदृष्ट्या पूर्णपणे खचून गेली होती.

विशेष प्रतिनिधी

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: bakhar Live