Dailyhunt
बारामतीची पाेटनिवडणूक बिनविराेध! लक्ष्मण हाके यांची माघार, काॅंग्रेसही अटींसह माघारीस तयार

बारामतीची पाेटनिवडणूक बिनविराेध! लक्ष्मण हाके यांची माघार, काॅंग्रेसही अटींसह माघारीस तयार

बखर Live 1 week ago

बारामती : बारामती विधानसभा पोटनिवडणूक बिनविराेध हाेण्याची चिन्हे दिसत आहेत. ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी माघार घेतली असून काॅंग्रेसचे उमेदवारही माघारीसाठी अटींसह तयार आहेत. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या विरोधात उमेदवार दिलेल्या काँग्रेस पक्षाने आपली भूमिका स्पष्ट केली असून, उमेदवारी मागे घेण्यासाठी महायुती सरकारसमोर एक अट ठेवली आहे.

Baramati

राज्य सरकारने जर दिवंगत नेते अजित पवार यांच्या विमान अपघाताप्रकरणी गुन्हा दाखल केला, तरच मी माझी उमेदवारी मागे घेण्याचा पुनर्विचार करेन, अशी घोषणा काँग्रेसचे उमेदवार अ‍ॅड. आकाश मोरे यांनी केली आहे.अजित पवार यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या या जागेवर निवडणूक बिनविरोध व्हावी, यासाठी सुनेत्रा पवार यांनी मोठे प्रयत्न केले होते. मात्र, काँग्रेसने शेवटच्या क्षणी माजी आमदार विजय मोरे यांचे पुत्र आकाश मोरे यांना मैदानात उतरवले.

आकाश मोरे म्हणाले, आम्ही लोकशाहीच्या रक्षणासाठी आणि भाजपच्या विचारधारेविरोधात ही लढाई लढत आहोत. अजित पवार यांचा झालेला अपघात हा केवळ योगायोग नसून, त्यातील सत्यापर्यंत पोहोचणे गरजेचे आहे. सरकारने अद्याप याप्रकरणी ठोस कारवाई केलेली नाही. जर सरकार या घटनेवर गुन्हा नोंदवून तपास करणार असेल, तर आम्ही निवडणुकीतून माघार घेण्याबाबत पुनर्विचार करू. आम्ही उमेदवारी मागे घेण्याबाबत पुनर्विचार करु.

तुम्ही या प्रकरणात गंभीर आहात का? बारामतीचा , महाराष्ट्राचा कर्ता पुरुष गेला आहे. या सगळ्या गोष्टी गृहमंत्र्यांच्या अखत्यारीत येतात. राज्यातील दुसऱ्या महत्त्वाच्या व्यक्तीचा अपघाती मृत्यू होत असेल तर याचा तुम्ही गांभीर्याने विचार करणार आहात की नाही. याच्यावर समर्पक उत्तर का देत नाहीत.

विधानसभेत सांगता पण बाहेर येऊन तुम्ही कोणती माहिती दिली. सगळं अलबेल आहे. आम्ही अजितदादांना विरोध केला पण विकासाच्या बाबतीत आम्ही त्यांच्या सोबत होतो. अत्यंत कर्तबगार माणूस गेला आणि त्यांच्याबाबत काहीच घडत नाही. जर महाराष्ट्रात एफआयआर दाखल केला गेला तर आम्ही माझ्या उमेदवारीचा पुनर्विचार करु. प्रदेशाध्यक्ष सकपाळ यांना मी याबाबत सांगितले तेव्हा त्यांनीही मला तसेच सांगितले, असेही आकाश मोरे म्हणाले.

दरम्यान, राष्ट्रवादी काॅंग्रेस अजित पवार गटाचे नेते व राज्याचे कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी लक्ष्मण हाके यांची भेट घेतली. त्यानंतर भरणे व हाके यांच्या झालेल्या एकत्रित पत्रकार परिषदेत हाके यांनी माघार घेतल्याचे जाहीर केले. मात्र, अद्यापही बिग बाॅसमधील स्पर्धक असलेले अभिजित बिचुकले हे मैदानात आहेत.

विशेष प्रतिनिधी
Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: bakhar Live