Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
भीषण वाहतूक कोंडी; अभिनेत्री सोनाली कुलकर्णी पाच तास अडकल्या

भीषण वाहतूक कोंडी; अभिनेत्री सोनाली कुलकर्णी पाच तास अडकल्या

बखर Live 3 weeks ago

मुंबई : सायन-पनवेल मार्गावर झालेल्या भीषण वाहतूक कोंडीमुळे बुधवारी रात्री वाहनचालकांना मोठा त्रास सहन करावा लागला. या कोंडीत अभिनेत्री सोनाली कुलकर्णी या देखील तब्बल पाच तास अडकल्या होत्या.

मानखुर्द मार्गे पुण्याकडे जात असताना त्या कोंडीत अडकल्या. त्यांनी रात्री अकराच्या सुमारास सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर करत आपली व्यथा मांडली. "गेल्या पाच तासांपासून मानखुर्दमध्ये अडकले आहे. पोलिसांनी संयम ठेवण्यास सांगितले, मात्र कोंडी कधी सुटेल याची माहिती नाही. भूक लागली असून खायला काही मिळत नाही, महिलांचीही मोठी गैरसोय झाली," असे त्यांनी सांगितले.

दरम्यान, सायन-पनवेल मार्गावरील वाहतूक कोंडीमुळे मुंबईहून नवी मुंबईकडे जाणारी वाहतूक ऐरोलीमार्गे वळवण्यात आली. मात्र, त्यामुळे ऐरोली मार्गावरही प्रचंड वाहतूक वाढली आणि तेथेही परिस्थिती जैसे थे राहिली.

नवी मुंबईकडे जाणाऱ्या नागरिकांना अवघ्या अर्ध्या तासाच्या प्रवासासाठी दोन ते अडीच तास लागल्याचे चित्र होते. या भीषण कोंडीमुळे नागरिक त्रस्त झाले असून, वाहतूक व्यवस्थापनावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

विशेष प्रतिनिधी

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: bakhar Live