नागपूर: मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी शनिवारी (29 ऑगस्ट) अंतरवाली सराटीत आमरण उपोषणाला सुरूवात केली असून आज दुसरा दिवस आहे. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पहिल्यांदाच प्रतिक्रिया देत सरकारची भूमिका स्पष्ट केली आहे.
(Devendra Fadnavis)
Cipla Pharma : 'सिप्ला'ला दिलासा ; 'एफडीए'कडून 'तो' निर्णय रद्द, कारण काय?
काय म्हणाले मुख्यमंत्री?
मुख्यमंत्री फडणवीस यांनी नागपुर दौऱ्यावर असताना पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी माध्यमांकडून त्यांना जरांगे पाटील यांच्या आंदोलनाबाबत प्रश्न विचारण्यात आला.
यावर बोलताना फडणवीस म्हणाले, आंदोलनास्थळी सरकारचे प्रतिनिधी उपस्थित आहेत. ते आंदोलकाशी चर्चा करतील आणि या विषयावर मार्ग काढतील. यापूर्वीही चर्चेतून मार्ग काढण्यात आला होता, पुढेही अशा प्रकारे समस्या सोडवली जाईल असे त्यांनी स्पष्ट केले.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यावर सुरूवातीपासून अत्यंत संवेदनशीलतेने काम करत असून मराठा आरक्षणांच्या मागण्या कायदेशीर आणि संविधानाच्या चौकटीत असतील असे त्यांनी सांगितले. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे उल्लंघन होणार नाही, सर्व मागण्यांवर सरकार चर्चा करण्यास तयार आहे, असे फडणवीसांनी स्पष्ट केले.
दुसरीकडे जरांगे यांनी सरकारने मागण्या मान्य न केल्यास मुंबईकडे कूच करण्याचा इशारा दिला आहे. 12 सप्टेंबरपर्यंत सरकारच्या निर्णयाची प्रतीक्षा करणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे. सध्या अंतरवाली सराटीतील आंदोलन आक्रमक होताना दिसत आहे. राज्याच्या विविध भागांतून मराठा बांधव अंतरवाली सराटीकडे येत आहेत.

