कोल्हापूर : देशातील नामांकीत शिक्षणतज्ज्ञ, माजी राज्यपाल आणि पद्मश्री पुरस्कार विजेते डॉ. ज्ञानदेव यशवंतराव (डी. वाय) पाटील यांचे मंगळवारी (04 ऑगस्ट) कोल्हापूर येथे निधन झाले. वयाच्या ९० व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
त्यांच्या निधनानंतर शिक्षण क्षेत्रातील एक मोठे व्यक्तिमत्त्व हरपल्याची भावना व्यक्त केली जात आहे. (Dr. D. Y. Patil Passws Away)
Solapur DCC: सोलापूर 'DCC' बँकेच्या निवडणुकीनिमित्त राजकारण तापले; गोरेंनी मोहिते- पाटलांना पुन्हा डिवचले !
गेल्या काही महिन्यांपासून ते आजारी होते. त्यांचा जन्म २२ ऑक्टोबर 1935 रोजी कोल्हापूर जिल्ह्यातील अंबाप या छोट्याशा गावात झाला होता. त्यांनी एका साध्या बहुजन शेतकरी कुटुंबातून पुढे येत स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केली होती. त्यांनी महाराष्ट्राच्या अनेक राज्यात गोरगरिबांसाठी शैक्षणकि संस्था स्थापन करत शिक्षण क्षेत्रात मोठे योगदान दिले आहे. त्यांनी केवळ शिक्षणच नव्हे, तर आरोग्य आणि क्रीडा क्षेत्रातही अनेक संस्था उभारुन लाखो विद्यार्थ्यांसाठी मोठी संधी उपलब्ध करुन दिली आहे.
शैक्षणिक क्षेत्रातील योगदान
शिक्षणाचा प्रसार सर्वसामान्यांपर्यंत व्हावा यासाठी त्यांनी डी. वाय. पाटील या ग्रुपची स्थापना केली. त्यांनी 1983 मध्ये नवी मुंबई येथे 'रामराव आदिक इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजी' (RAIT) या पहिल्या अभियांत्रिकी महाविद्यालयाची स्थापना केली होती. पुढे त्यांनी कोल्हापूर, मुंबई, पुणे यांसारख्या शहरांमध्ये ३ हून अधिक डीम्ड युनिव्हर्सिटीज, ६ खाजगी विद्यापीठे आणि १८० पेक्षा जास्त शिक्षण संस्था सुरू केल्या. डी. वाय. पाटील यांनी अभियांत्रिकी, वैद्यकीय (मेडिकल), फार्मसी, मॅनेजमेंट, आर्किटेक्चर आणि कृषी यांसारख्या विविध क्षेत्रांत विद्यार्थ्यांसाठी मोठ्या संधी उपलब्ध करुन दिल्या आहेत.
राजकीय कारकिर्द
त्यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरूवात 1957 मध्ये कॉंग्रेस पक्षातून केली होती. 1957 ते 1952 दरम्यान ते कोल्हापूरचे महापौर राहिले होते. 1967 ते 172 च्या काळात ते पन्हाळा मतदारसंघातून आमदार निवडून आले होते. त्यांनी त्रिपुरा, पश्चिम बंगाल आणि बिहारचे राज्यपालपदही भूषवले आहे. परंतु 1978 च्या निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर पुढे त्यांनी राजकारणापासून दूर राहत शिक्षण क्षेत्राच्या विकासावर लक्ष्य दिले. त्यांच्या या राजकीय-सामाजिक-शैक्षणिक क्षेत्रात दिलेल्या योगदानासाठी भारत सरकारकडून त्यांना 1991 साली पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

