मुंबई: Eknath Shinde खरात हा माणुसकीला काळिमा आहे, अशा वृत्तीला थारा देणार नाही, असे सांगत मी जे काही करतो ते मोकळेपणाने करतो, लपून-छपून काहीही करत नाही, असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठणकावून सांगितले.Eknath Shinde
एका वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात बोलताना अशोक खरात प्रकरणावर भाष्य करताना शिंदे म्हणाले, मी करतो ते मोकळेपणाने करतो, मी लपून छपून काही करत नाही. मी शिर्डीत गेलो होतो, दोन मंत्री होते, मीडियाही माझ्यासोबत होता. एका कार्यकर्त्याने सांगितले, आता कुणाच्या कपाळावर काय लिहिलेलंय का? आपण काय कॅरेक्टर सर्टिफिकेट मागतो का? तसेच खरात हा माणुसकीला काळिमा आहे, अशा वृत्तीला थारा देणार नाही. ती आमची वृत्ती नाही. खरातला त्याची सजा होणारचEknath Shinde
आमदार दीपक केसरकर आणि मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या संदर्भात विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना मुख्यमंत्री म्हणाले की, अनेकदा कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव मी सार्वजनिक कार्यक्रमांना उपस्थित राहतो, मात्र तिथे येणाऱ्या प्रत्येकाच्या कपाळावर त्याचे 'कॅरेक्टर सर्टिफिकेट' लिहिलेले नसते.

