Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
एसटी बसस्थानकांवर तृतीयपंथीयांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृहे

एसटी बसस्थानकांवर तृतीयपंथीयांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृहे

बखर Live 3 weeks ago

राज्यातील सहा विभागांसाठी ९ कोटी ७६ लाख रुपयांच्या प्रस्तावाला मंजुरी

राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्या पुढाकाराला यश

पुणे : राज्यातील एसटी बसस्थानकांवर तृतीयपंथीय व्यक्तींसाठी स्वतंत्र स्वच्छतागृहे उभारण्याच्या प्रस्तावाला राज्य सरकारने प्रशासकीय मान्यता दिली आहे.

मुंबई, पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, अमरावती आणि नागपूर या सहा प्रादेशिक विभागांतील विविध बसस्थानकांवर ही सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यासाठी ९ कोटी ७६ लाख ६३ हजार १९५ रुपयांच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली आहे.

राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी यासंदर्भात पुढाकार घेऊन संबंधित विभागांना दिलेल्या निर्देशानुसार परिवहन विभागाने बुधवारी (ता. १४) शासन निर्णय प्रसिद्ध केला.

एसटी बसस्थानकांवर तृतीयपंथीय व्यक्तींसाठी स्वतंत्र स्वच्छतागृहांची व्यवस्था नसल्यामुळे त्यांना अनेक सामाजिक आणि शारीरिक अडचणींना सामोरे जावे लागते. विशेषतः प्रवासादरम्यान त्यांची मोठ्या प्रमाणात कुचंबणा होते. ही बाब लक्षात घेऊन राज्यमंत्री मिसाळ यांनी एसटी महामंडळाला बसस्थानकांवर स्वतंत्र स्वच्छतागृहे उभारण्याच्या सूचना दिल्या होत्या.

त्यानुसार एसटी महामंडळाने विविध बसस्थानकांवर स्वच्छतागृहे उभारण्यासाठी प्रस्ताव तयार केला. महामंडळाच्या उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालकांनी १० फेब्रुवारी आणि २२ सप्टेंबर २०२६ रोजी शासनाकडे प्रस्ताव सादर केला होता. या प्रस्तावाला तातडीने प्रशासकीय मान्यता देण्याचे आणि सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडून निधी उपलब्ध करून देण्याचे निर्देश मिसाळ यांनी दिले होते.

या पार्श्वभूमीवर परिवहन विभागाने प्रस्तावाला प्रशासकीय मान्यता दिली आहे. स्वच्छतागृहांच्या बांधकामासाठी लागणारा खर्च सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या तृतीयपंथीयांच्या कल्याणासाठी उपलब्ध असलेल्या निधीतून करण्यात येणार आहे. बांधकाम सुरू करण्यापूर्वी आवश्यक नकाशांना मंजुरी घेणे, सविस्तर अंदाजपत्रक तयार करणे आणि संबंधित कार्यकारी अभियंत्यांची तांत्रिक मान्यता घेणे बंधनकारक करण्यात आले आहे.

स्वतंत्र स्वच्छतागृहांमुळे तृतीयपंथीय व्यक्तींना एसटी बसस्थानकांवर अधिक सन्मानाने आणि सुरक्षितपणे प्रवास करता येणार असून, सार्वजनिक सुविधांमध्ये त्यांच्यासाठी स्वतंत्र व्यवस्था निर्माण करण्याच्या दृष्टीने हा महत्त्वाचा निर्णय ठरणार आहे.

"तृतीयपंथीय व्यक्तींना सार्वजनिक ठिकाणी सन्मानाने वावरता आले पाहिजे. एसटी बसस्थानकांवर स्वतंत्र स्वच्छतागृहे नसल्यामुळे त्यांची होणारी गैरसोय दूर करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. संबंधित प्रस्तावाला प्रशासकीय मान्यता मिळाली असून, या सुविधांची कामे मार्गी लावली जातील."

महत्त्वाच्या बातम्या

विशेष प्रतिनिधी
Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: bakhar Live