Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
Gokul Election : गोकुळच्या निवडणुकीची तारीख ठरली? ऐन गणेशोत्सवात उडणार धुराळा

Gokul Election : गोकुळच्या निवडणुकीची तारीख ठरली? ऐन गणेशोत्सवात उडणार धुराळा

बखर Live 1 week ago

कोल्हापूर: गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीची प्रक्रिया अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. येत्या 4 सप्टेंबरला अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होणार आहे. यानंतर 10 सप्टेंबरपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या प्रक्रियेला सुरूवात होईल.

यामुळे ऐन गणेशोत्सवाच्या काळात निवडणुकीचे वातावरण रंगण्याची शक्यता आहे. (Gokul Election)

Nepal Flash Flood : नेपाळच्या महापुराचा भारतालाही धोका ; कारण काय?

दरम्यान, प्रभारी विभागीय उपनिबंधक नारायण परजाने यांच्या उपस्थितीत आज (27 ऑगस्ट), 410 संस्थांच्या हरकतींवर सुनावणी झाली. यावेळी चुकीच्या पद्धतीने संबंधित संस्थांची नोंदणी झाली असून त्यांना अंतिम मतदार यादीत स्थान देऊ नये अशी मागणी करण्यात आली. मात्र, या संस्थांबाबत सहकार न्यायालयात सुनावणी सुरू असून न्यायालयाचा निर्णय होईपर्यंत कोणतीही कार्यवाही करू नये अशी भूमिका मांडण्यात आली.

सर्वोच्च न्यायालयाने गोकुळ दूध संघाची निवडणूक 60 दिवसांत घेण्याचे आदेश दिले आहेत. यामुळे निवडणूक निर्धारित वेळेत घेण्यासाठी प्रशासनाकडून हालचाली सुरू आहेत. पुढील आठवड्यात महसूल विभागातील उपजिल्हाधिकाऱ्यांची निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून नियुक्ती होण्याची शक्यता आहे.

ताराबाई पार्क येथील गोकुळ दूध संघाच्या इमारतीत निवडणूक होणार असून यासाठी परिसरात मंडप उभारण्याची तयारी सुरू आहे. पुढील 15 दिवसांत प्रचार आणि मतदान प्रक्रिया पार पडेल. तर संपूर्ण निवडणूक प्रक्रिया 30 सप्टेंबरपर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन आहे. घटस्थापनेपूर्वी नव्या संचालक मंडळाची स्थापना होण्याची शक्यता आहे.

विशेष प्रतिनिधी
Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: bakhar Live