Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story

इंदापूरमध्ये २९ वर्षीय डॉक्टरची आत्महत्या

बखर Live 1 day ago

बारामती : इंदापूर शहरातील अंबिकानगर परिसरात राहत्या घरी २९ वर्षीय डॉक्टरने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना गुरुवारी (ता. १७) सकाळी साडेसातच्या सुमारास उघडकीस आली. डॉ. अवधूत विठ्ठल खबाले असे मृत डॉक्टरचे नाव आहे.

त्यांच्या निधनाने वैद्यकीय क्षेत्रात हळहळ व्यक्त होत आहे.

इंदापूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,डॉ. खबाले यांच्या आत्महत्येची माहिती त्यांच्या नातेवाईकांना मिळाल्यानंतर त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर नातेवाईक आणि इंदापूर पोलिसांच्या मदतीने त्यांना तातडीने उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.

TMC Symbol Row : ममता बॅनर्जींना मोठा धक्का ; तृणमूल काँग्रेसचे नाव अन् चिन्ह गोठवले

मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी केल्यानंतर त्यांना मृत घोषित केले. डॉ. खबाले यांच्या वडिलांचे दोन महिन्यांपूर्वी निधन झाले होते. त्यानंतर ते मानसिक तणावात असल्याचे नातेवाईकांनी सांगितले. मात्र, आत्महत्येचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. डॉ. अवधूत खबाले हे त्वचारोगतज्ज्ञ म्हणून इंदापूर शहरात वैद्यकीय सेवा देत होते.

तरुण वयातच त्यांनी वैद्यकीय क्षेत्रात आपली ओळख निर्माण करण्यास सुरुवात केली होती. त्यांच्या अचानक निधनाने नातेवाईक, मित्रपरिवार आणि वैद्यकीय क्षेत्रातील सहकाऱ्यांना धक्का बसला आहे. या प्रकरणी इंदापूर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. सहाय्यक पोलिस निरीक्षक भारत जाधव पुढील तपास करीत आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

विशेष प्रतिनिधी
Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: bakhar Live