पुणे : गंगाधाम चौक येथील आईमाता मंदिर परिसरात बुधवारी मध्यरात्री एका केमिकल कंपनीतील टाकीतून गॅस गळती झाल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले.
या घटनेत 24 नागरिकांना श्वसनाचा त्रास जाणवला असून त्यांची प्रकृती स्थिर आहे.
अग्निशमन दलाच्या जवानांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत बीए सेट परिधान करून बचावकार्य सुरू केले. बाधितांपैकी 14 नागरिकांना शासकीय 108 रुग्णवाहिकेद्वारे रुग्णालयात हलविण्यात आले. तसेच अग्निशमन दलाचे एक अधिकारी व एक जवान यांनादेखील उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

