मुंबई : MPSC Examination महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) राज्य सेवा मुख्य परीक्षा २०२४ चा अंतिम निकाल जाहीर झाला असून सोलापूरच्या विजय नागनाथ लामकाने याने सर्वसाधारण आणि मागासवर्गीय गटातून राज्यात पहिला क्रमांक पटकावला आहे.
मुलींमध्ये सोलापूरचीच आरती परमेश्वर जाधव हिने राज्यात प्रथम क्रमांक मिळविला.MPSC Examination
विजय लामकाने याने राज्य सेवा मुख्य परीक्षेत ६२४ गुण मिळवत राज्याच्या गुणवत्ता यादीत अव्वल स्थान मिळवले. त्याला उपजिल्हाधिकारी हे प्रतिष्ठेचे पद मिळाले आहे. आरती जाधव हिने ६०१ गुणांसह महिलांच्या गटातून राज्यात पहिला क्रमांक पटकावला आहे.MPSC Examination
जा. क्र. ०१३/२०२५ राज्य सेवा मुख्य परीक्षा - २०२४ - अंतिम गुणवत्ता यादी आणि अंतिम शिफारस यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.https://t.co/VQ45ORd2xFhttps://t.co/4mfWCTvjhBhttps://t.co/h76NBDFQF0
- Maharashtra Public Service Commission (@mpsc_office)

