Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
फक्त फाशी नाही, दगडाने ठेचला, जिवंत जाळला पाहिजे , नसरापूर प्रकरणातील आराेपीच्या पत्नीचा संताप

फक्त फाशी नाही, दगडाने ठेचला, जिवंत जाळला पाहिजे , नसरापूर प्रकरणातील आराेपीच्या पत्नीचा संताप

बखर Live 2 weeks ago

पुणे : त्याला फक्त फाशी नाही, त्याला ठेचला पाहिजे. जिवंत जाळला पाहिजे. त्यानंतनरही माझ्या मनाची झालेली आग शांत होणार नाही, असा संताप नसरापूर बलात्कार प्रकरणातील आरोपीच्या पत्नीनह व्यक्त केला आहे.

आरोपीच्या प मुलाने त्या नराधमाला आपला बाप म्हणवून घेण्याची लाज वाटत असल्याची संतप्त भावना व्यक्त केली आहे.

आरोपीच्या पत्नीने मागील 10 वर्षांपासून आपले त्याच्याशी कोणतेही संबंध नसल्याचाही दावा केला आहे. त्या म्हणाल्या बाळाची हत्या झाली त्याच ठिकाणी त्याला तसेच ठेचून मारले पाहिजे. मला त्याचे तोंडही पाहायचे नाही. मला कुणी त्याचा अंत्यविधी झाल्याचेही सांगू नये. मागील 10 वर्षांपासून तो आमच्या संपर्कात नाही. त्याला कठोर शिक्षा झाली पाहिजे. फक्त फाशी नाही, त्याला ठेचला पाहिजे. जिवंत जाळला पाहिजे. त्यानंतनरही माझ्या मनाची झालेली आग शांत होणार नाही.त्याचे नाव आमच्या नावाला जोडले गेले आहे. त्यामुळे आम्हाला लोकांचे बोलणे ऐकून घ्यावे लागत आहेत.

आरोपीच्या मुलाने आरोपीला आपले वडील म्हणवून घ्यायलाही लाज वाटत असल्याचा संताप व्यक्त केला आहे. मला तो माझा बाप म्हणवून घेण्याचीही लाज वाटत आहे. त्या चिमुकलीशी त्याने अमानुष कृत्य केले. त्याला कठोरात कठोर शिक्षा द्यायला हवी. विशेषतः त्याला त्याच ठिकाणी ठेचून मारून त्या चिमुकलीला न्याय दिला पाहिजे. मला भाचा - भाची आहेत. ती चिमुकलीही मला माझ्या भाचीसारखीच होती. या घटनेनंतर मला खूप वाईट वाटत आहे. त्याला मारले पाहिजे. आम्हाला सध्या खूप मानसिक त्रास होत आहे. आपण शिवछत्रपतींच्या महाराष्ट्रात राहतो. न्यायव्यवस्थेवरील लोकांचा विश्वास वाढेल असे काहीतरी आपण केले पाहिजे, असे आरोपीचा मुलगा म्हणाला.

नसरापुरात एक मे रोजी एका 65 वर्षीय आरोपीने गावातील 4 वर्षीय चिमुकलीचा पाठलाग करून तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर दगडाने ठेचून तिची निर्घृण हत्या केली. कुणाला संशय येऊ नये म्हणून पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने त्या मुलीचा मृतदेह त्याने शेणाच्या ढिगाऱ्याखाली पुरला. मुलीच्या कुटुंबीयांनी गावकऱ्यांच्या मदतीने तिचा शोधाशोध सुरू केली तेव्हा तिचा मृतदेह सापडला. त्यानंतर पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारावर आरोपीच्या मुसक्या आवळल्या.

पोलिसांच्या मते, आरोपीचा असे पाशवी गुन्हे केल्याचा इतिहास आहे. यापूर्वी याच कारणासाठी गावकऱ्यांनी त्याची धिंड काढून त्याला गावाबाहेर हाकलून दिले होते. त्याला स्वतःला 7 मुली आहेत. 2015 साली आरोपीने एका छोट्या मुलीवर बलात्कार केला होता. तेव्हा त्याच्यावर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल होऊन शिक्षाही झाली होती. पण त्याच्या पत्नीने त्याची जामिनावर सुटका केली होती. एका वृद्ध महिलाही त्याच्या वासनेला बळी पडल्याचे सांगितले जात आहे.

विशेष प्रतिनिधी

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: bakhar Live