Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
Pune Crime : श्रावणात मटणाचा हट्ट अन् दारूचे व्यसन; संतापलेल्या बापाने मुलाला संपवले, अन्.

Pune Crime : श्रावणात मटणाचा हट्ट अन् दारूचे व्यसन; संतापलेल्या बापाने मुलाला संपवले, अन्.

बखर Live 2 weeks ago

पुणे: पुण्यातील वारजे माळवाडी परिसरातून एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक प्रकार समोर आला आहे. श्रावण महिना सुरू असताना दारूच्या नशेत मटण शिजवून देण्याचा हट्ट धरल्याने झालेल्या कौटुंबिक वादातून पन्नाशी पार केलेल्या वडिलांनी स्वतःच्याच ३० वर्षांच्या मुलाची बेदम मारहाण करून हत्या केली.

२४ ऑगस्टच्या रात्री रामनगर भागात ही दुर्दैवी घटना घडली. Pune Crime

Maharashtra Weather : राज्यात पुन्हा पावसाचा जोर ; कोणत्या भागात किती पाऊस? हवामान विभागाचा अंदाज काय?

या घटनेत महेश भागवत गायकवाड (वय ३०) या तरुणाचा मृत्यू झाला आहे. पोलिसांनी याप्रकरणी कारवाई करत महेशचे वडील भागवत सूर्यभान गायकवाड (वय ६४) आणि आई पार्वती भागवत गायकवाड (वय ६०) या दोघांना बेड्या ठोकल्या आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत महेशचे १० वर्षांपूर्वी लग्न झाले होते. मात्र, त्याला दारूचे गंभीर व्यसन होते आणि तो कोणताही कामधंदा करत नव्हता. या त्रासाला कंटाळून काही दिवसांपूर्वीच त्याच्या पत्नीने घटस्फोट घेतला आणि ती दोन मुलांना घेऊन माहेरी निघून गेली. महेश एकटाच राहत होता आणि जेवणासाठी शेजारी राहणाऱ्या आई-वडिलांकडे जात असे. Pune Crime

महेश नेहमी दारूच्या नशेत मांसाहारी जेवणाची मागणी करत असे. सध्या श्रावण महिना सुरू असल्याने घरात मांसाहार शिजवला जात नव्हता. २४ ऑगस्ट रोजी रात्री १०:३० वाजता नेहमीप्रमाणे दारू पिऊन आलेल्या महेशने पुन्हा मटणाचे कालवण करण्याचा हट्ट धरला. आई-वडिलांनी नकार दिला असता त्याने वाद घालण्यास सुरुवात केली. या वादातून संतापाच्या भरात वडील भागवत यांनी महेशच्या डोक्यावर आणि तोंडावर निर्दयीपणे जबर मारहाण केली. यात महेशचा जागीच मृत्यू झाला. मुलगा दगावल्याचे समजल्यानंतरही आई पार्वतीने पतीला वाचवण्यासाठी ही घटना कोणालाही कळू दिली नाही. तिने घटनास्थळावरील रक्ताचे डाग साफ करून हत्येचे पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला.

या प्रकरणी महेशच्या मोठ्या भावाने वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात धाव घेऊन फिर्याद दिली. पोलिसांनी तत्काळ हत्येचा गुन्हा दाखल करत मुलाची हत्या करणाऱ्या बापाला आणि पुरावे नष्ट करणाऱ्या आईला अटक केली आहे. वारजे माळवाडी पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

विशेष प्रतिनिधी
Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: bakhar Live