पुणे: राज्य मानवाधिकार आयोगने (MSHRC) पुणे पोलीस आयुक्तांसह मुख्य सचिव आणि ११ पोलीस अधिकाऱ्यांना नोटीस बजावली आहे. पुणे शहरातील लक्ष्मीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका २० वर्षीय तरुणाला अपमानित करून हात दोरीने बांधून सार्वजनिक ठिकाणी धिंड काढल्याचा आरोप पुणे पोलिसांवर आहे.
(Pune Police)
Success Story: तळेगावच्या श्रद्धाची 'मिस युनिव्हर्स' स्पर्धेसाठी निवड; विजयानंतर भरभरून कौतुक अन् शुभेच्छांचा वर्षाव
नेमके प्रकरण काय?
मिळालेल्या माहितीनुसार, वाहनांची तोडफोड केल्याच्या संशयावरून लक्ष्मीनगर पोलिस ठाण्यातील पोलिसांनी एका तरुणाला ताब्यात घेतले होते. त्यानंतर त्याची भररस्त्यात धिंड काढून त्याला अपमानास्पद वागणूक दिल्याचा, त्याचे हात दोरीने बांधून सार्वजनिक रस्त्यावरून फिरवले असल्याचे सांगितले जात आहे.
'एमएसएचआरसी'कडून घटनेची दखल
ही घटना समोर आल्यानंतर 'एमएसएचआरसी'ने पुणे पोलीस आयुक्त, राज्याचे मुख्य सचिव तसेच संबंधित 11 पोलीस अधिकाऱ्यांना मानवाधिकार संरक्षण कायद्यातील कलम 16 अंतर्गत नोटीस बजावून संबंधित प्रकरणावर सविस्तर अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. या प्रकरणात मानवी हक्कांचे उल्लंघन झाले आहे का? याची आयोगाकडून तपासणी केली जाणार आहे.
दरम्यान, या प्रकरणावर पुणे पोलिसांची सविस्तर भूमिका अद्याप समोर आलेली नाही. आयोगाकडे अहवाल सादर झाल्यानंतर पुढील कारवाईबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे.

