Dailyhunt
पुण्यात काँग्रेसला मिळणार नवा 'शहराध्यक्ष'; कुणाच्या नावाची चर्चा?

पुण्यात काँग्रेसला मिळणार नवा 'शहराध्यक्ष'; कुणाच्या नावाची चर्चा?

बखर Live 0 months ago

पुणे : राज्यातील लोकसभा निवडणुकीनंतर पुण्यातील काँग्रेसचा शहर अध्यक्ष बदलण्याचा चर्चांनी चांगलाच जोर धरला होता.सध्याचे प्रभारी शहर अध्यक्ष असलेले अरविंद शिंदे यांची शहराध्यक्ष पदावरुन उचलबांगडी होण्यासाठी काँग्रेस मधील नेत्यांनी मुंबई आणि दिल्लीतील जेष्ठ नेत्यांचा भेटी घेतल्या,मात्र शहर अध्यक्ष बदलीचा निर्णय घेण्यात आला नाही.

Congress

मात्र आता पुणे काँग्रेसचा शहर अध्यक्ष बदलण्याचा प्रक्रियेला सुरुवात झाली आहे.पुण्यात ज्याप्रमाणे शिवसेना ठाकरे गट आणि राष्ट्रवादीचे पूर्व आणि पश्चिम भागात दोन शहर अध्यक्ष आहेत,त्याचप्रमाणे काँग्रेस कडू देखील दोन शहर अध्यक्ष नेमण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.पुणे काँग्रेस मध्ये नवीन शहर अध्यक्ष निवडला जाणार असल्याने,त्यामुळे काँग्रेस मधील विविध गट शहर अध्यक्षपद आपल्याकडे रहाव यासाठी प्रयत्न करताना पाहायला मिळत आहेत.

नवीन शहराध्यक्षपदाची निवड प्रकिया लवकर पार पाडणार आहे.त्यासाठी हिमाचलचे आमदार विनोद सुलतानपूरी यांची निरीक्षक म्हणून निवड करण्यात आली आहे.या साठी सुलतानपूरी आणि पुणे शहराचे प्रभारी सतेज पाटील हे तीन दिवस शहरात बैठका घेणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

7 एप्रिल अर्ज दाखल करण्याचा दिवस

पुणे शहराध्यक्ष निवडीसाठी तीन दिवस बैठका घेण्यात येणार आहेत.7 एप्रिल रोजी शहराध्यक्ष पदासाठी इच्छुक असलेले कार्यकर्ते आणि पदाधिकारी अध्यक्षपदासाठी अर्ज दाखल करणार आहेत.

कुणाची लागणार वर्णी?

पुणे काँग्रेसचे शहर अध्यक्षपद आपल्याकडे राहावे यासाठी कार्यकर्ते आणि पदाधिकारी फील्डिंग लावताना पाहायला मिळत आहेत.अरविंद शिंदे यांचा उचल बांगडीनंतर काँग्रेच्या शहराध्यक्षपदासाठी माजी आमदार मोहन जोशी,राष्ट्रवादी शरद पवार गटातून काँग्रेस मध्ये आलेले प्रशांत जगताप यांचा नावाची चर्चा चालू असल्याचं पाहायला मिळत आहे.

विशेष प्रतिनिधी

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: bakhar Live