मुंबई : महाराष्ट्र विधान परिषद निवडणुकीत संधी दिली गेली नाही म्हणून टीका करणाऱ्यांना भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी उत्तर दिले आहे. मला ट्रोल करण्यात, 'सतरंजी उचले' म्हणण्यात ज्यांना आनंद मिळतो, तो त्यांनी जरूर घ्यावा.
त्यांनाही मनापासून शुभेच्छा!, असे उपाध्ये यांनी म्हटले आहे. Keshav Upadhye
केशव उपाध्ये यांना भाजपकडून विधान परिषदेवर आमदारकीची संधी दिली जाणार अशी चर्चा होती. मात्र त्यांचे नाव यादीत आले नाही. ज्येष्ठ नेते माधव भांडारी यांच्याप्रमाणे उपाध्ये यांनाही पक्षाने पुन्हा नाकारले. भाजपमध्ये त्यांनी केवळ सतरंज्याच उचलावाव्यात अशी टीका केली जात होती.
तर सोशल मीडियावरून उत्तर देताना उपाध्ये यांनी की घेतले न हे व्रत अंधतेने…"असे शीर्षक देऊन केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, २५-३० वर्षांपूर्वी विचारधारेचे काम सुरू करताना कुठे, काय, कोण, कधी होणार याचा कधीही विचार केला नव्हता. प्रखर राष्ट्रवादाची भावना आणि सकारात्मक काम करण्याची जिद्द, यातूनच या प्रवासाला सुरुवात झाली… आणि पाहता पाहता २५-३० वर्षे कधी निघून गेली ते कळलेच नाही.
ध्येय डोळ्यासमोर ठेवून काम करत राहिलो… अनेक प्रसंग आले आणि मग अशा वेळी अटल बिहारी वाजपेयी नेहमी ज्यांची कविता सांगायचे त्या शिवमंगल सिंह सुमन यांच्या ओळी कायम प्रेरणा देत राहिल्या…
"संघर्ष पथ पर जो मिले, यह भी सही… वह भी सही…"
हीच एका खऱ्या कार्यकर्त्याची भूमिका असते… आणि तीच भूमिका आजही कायम आहे.
परवा सायंकाळी विधान परिषद निवडणुकीसाठी उमेदवार जाहीर झाले. हे सर्व सहकारीच आहेत. त्यामुळे मनापासून आनंद झाला. सुनील कर्जतकर, माधवी नाईक, प्रमोद जठार तसेच संजय भेन्डे आणि विवेक कोल्हे यांचे मनःपूर्वक अभिनंदन!

