Dailyhunt
Sharmila Thackeray : कोणती बाई बेशुद्ध दिसते? अशोक खरात प्रकरणी शर्मिला ठाकरे यांचा सवाल

Sharmila Thackeray : कोणती बाई बेशुद्ध दिसते? अशोक खरात प्रकरणी शर्मिला ठाकरे यांचा सवाल

बखर Live 6 days ago

मुंबई: Sharmila Thackeray मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांनी महिलांना भोंदूबाबांपासून दूर राहण्याचे आवाहन केले आहे. महिलांनी भोंदूबाबांकडे जाणे बंद करावे. हे लोक स्वतःला ब्रह्मा, विष्णू, महेश, लक्ष्मी, पार्वती असे काहीही म्हणतात.

आपण त्यांच्या बोलण्याला बळी पडू नये. व्हायरल व्हिडिओमध्ये कोणती बाई बेशुद्ध दिसते? आपला समाज कोणत्या दिशेला चाललाय? असा सवाल केलाSharmila Thackeray

राज्यात सध्या नाशिकचा भोंदूबाबा अशोक खरातचे प्रकरण चांगलेच गाजत आहे. खरातवर अनेक महिलांचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप आहे. यासंबंधीचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालेत. त्यानंतर अनेक महिलांनी अशोक खरातने आपण बेशुद्धावस्थेत असताना आपले लैंगिक शोषण केल्याचा दावा केला आहे. पण शर्मिला ठाकरे यांनी हाच धागा पकडत कोणत्या व्हिडिओमध्ये महिला बेशुद्ध दिसतात? असा तिखट सवाल उपस्थित केला आहे. यावेळी त्यांनी महिलांना अशा भोंदूबाबांपासूर स्वतःला दूर ठेवण्याचेही आवाहन केले.Sharmila Thackeray

शर्मिला ठाकरे म्हणाल्या, महिलांनी सर्वप्रथम भोंदूबाबांकडे जाणे बंद करावे. आमचे 13 आमदार आले होते, तेव्हा आमच्याकडे भोंदूबाबांसाठी अनेकजण आले होते. हे भोंदूबाबा स्वतःला ब्रह्मा, विष्णू, महेश, लक्ष्मी, पार्वती असे काहीही म्हणतात. पण आम्ही कुणाच्याही पाया पडत नाही. या लोकांनी आमच्यासोबत फोटो काढून लोकांना आम्ही त्यांचे भक्त आहोत असे सांगितले तर आम्ही तिथे येऊन त्यांच्या कानशिलात हाणणार. त्यामुळे आमच्याकडे कुणी येतच नाही.

भोंदूबाबा फसवतात म्हणजे काय? तुम्ही सुद्धा व्हिडिओ बघितले असतील. त्यात कोणती बाई बेशुद्ध दिसते हो तुम्हाला. काय आहे हे? काय चाललंय हे? आपला समाज कोणत्या दिशेला चालला आहे?, असे शर्मिला ठाकरे म्हणाल्या.

विशेष प्रतिनिधी
Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: bakhar Live