Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
सिंहगडावरून सूर्यास्त पाहताना घसरला पाय, दीडशे फूट  दरीत पडलेल्या पर्यटकाची थरारक सुटका

सिंहगडावरून सूर्यास्त पाहताना घसरला पाय, दीडशे फूट दरीत पडलेल्या पर्यटकाची थरारक सुटका

बखर Live 1 month ago

पुणे : सिंहगड किल्ल्यावर सूर्यास्त पाहताना पाय घसरून सुमारे १५० फूट खोल दरीत पडलेल्या पर्यटकाची रेस्क्यू टीम आणि पोलिसांनी थरारक सुटका केली.

योगेश मोहन शितोळे (वय ३५, रा. शिरूर) असे जखमी पर्यटकाचे नाव आहे.

Sinhagad

योगेश शितोळे हे मंगळवारी सकाळी सिंहगड फिरण्यासाठी आले होते. दुपारी साडेचार ते पाचच्या सुमारास ते सूर्यास्ताचे फोटो काढण्यासाठी गडाच्या पश्चिम दिशेला असलेल्या 'हवा पॉईंट' परिसरात गेले होते. यावेळी गवतावरून त्यांचा पाय घसरल्याने ते सुमारे १५० ते १७० फूट खोल दरीत कोसळले.

दरीत पडल्यामुळे काही वेळातच त्यांची शुद्ध हरपली. सायंकाळी साडेसातच्या सुमारास शुद्धीवर आल्यानंतर त्यांनी तात्काळ ११२ या आपत्कालीन क्रमांकावर संपर्क साधून दरीत पडल्याची माहिती दिली.घटनेचे

गांभीर्य लक्षात घेऊन हवेली पोलीस ठाण्याचे कर्मचारी अनिकेत काळे यांनी ही माहिती हवी आपत्ती व्यवस्थापन रेस्क्यू टीमला दिली. त्यानंतर रेस्क्यू टीम आणि हवेली पोलिसांचे कर्मचारी तात्काळ सिंहगडावर दाखल झाले. बचाव पथकाने खोल दरीत उतरून शितोळे यांना सुरक्षितपणे वर आणले.

यानंतर त्यांना उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्या नातेवाईकांनाही घटनेची माहिती देण्यात आली.

या बचाव मोहिमेत तानाजी भोसले, संतोष भगत, गणेश सपकाळ, संजय चोरघे, नाना जरंडे, कृष्णा मरगळे, उत्तम पिसाळ, वैभव भोसले तसेच पोलिस कर्मचारी अनिकेत काळे आणि प्रविण तेलवाडे यांनी सहभाग घेतला.

विशेष प्रतिनिधी

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: bakhar Live