Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
सिया गोयलच्या 'पॉलीग्राफ टेस्ट'साठी पोलीस न्यायालयात

सिया गोयलच्या 'पॉलीग्राफ टेस्ट'साठी पोलीस न्यायालयात

बखर Live 1 week ago

पुणे : लोणावळ्याजवळील लोहगड किल्ल्यावरून व्यावसायिक केतन अग्रवाल याला दरीत ढकलून हत्या केल्याच्या बहुचर्चित प्रकरणात तपासाला वेग देण्यासाठी पुणे पोलिसांनी महत्त्वाचे पाऊल उचलले आहे.

Siya Goyal

या प्रकरणातील मुख्य आरोपी आणि केतनची होणारी पत्नी सिया गोयल हिची 'पॉलीग्राफ (लाय डिटेक्टर)' चाचणी करण्यासाठी पोलिसांनी पुणे न्यायालयात परवानगी मागितली आहे.

गुरुवारी न्यायालयात सादर केलेल्या अर्जात पोलिसांनी म्हटले आहे की, तपासादरम्यान आरोपींचे जबाब नोंदविण्यात आले असले तरी केतनला दरीत नेमके कुणी ढकलले, याबाबत कोणताही प्रत्यक्ष साक्षीदार किंवा ठोस तांत्रिक पुरावा अद्याप हाती लागलेला नाही. त्यामुळे या प्रकरणातील सत्य उघड करण्यासाठी आणि तपासाला योग्य दिशा मिळण्यासाठी पॉलीग्राफ चाचणी आवश्यक असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.

पोलिसांनी सिया गोयल तसेच तिचा कथित प्रियकर आणि सहआरोपी चेतन चौधरी यांचे जबाब नोंदवले आहेत. मात्र, त्यांच्या जबाबांमध्ये विसंगती असण्याची शक्यता असल्याने या चाचणीद्वारे नवीन धागेदोरे मिळू शकतात, असा दावा तपास यंत्रणेने केला आहे.

दरम्यान, कायद्यानुसार पॉलीग्राफ चाचणीचा अहवाल न्यायालयात थेट पुरावा म्हणून ग्राह्य धरला जात नाही. मात्र, तपासाला गती देणे, संशयितांच्या जबाबांची पडताळणी करणे आणि लपलेली माहिती समोर आणण्यासाठी या चाचणीचा उपयोग केला जातो. आता पोलिसांच्या या अर्जावर न्यायालय काय निर्णय देते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

विशेष प्रतिनिधी

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: bakhar Live