Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
सुधारित वेतनश्रेणीसाठी न्यायालयीन कर्मचाऱ्यांचा एल्गार; बारामतीत बेमुदत संप सुरू

सुधारित वेतनश्रेणीसाठी न्यायालयीन कर्मचाऱ्यांचा एल्गार; बारामतीत बेमुदत संप सुरू

बखर Live 4 days ago

बारामती : उच्च न्यायालयाने मंजूर केलेल्या प्रस्तावानुसार सुधारित वेतनश्रेणी लागू करण्याच्या मागणीसाठी राज्यातील न्यायालयीन कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या बेमुदत संपाचा आज दुसरा दिवस आहे.

बारामती तालुका न्यायालयातील कर्मचारीही या आंदोलनात सहभागी झाले असून, शासनाने मागण्यांची दखल घेऊन तातडीने निर्णय घ्यावा, अशी भूमिका कर्मचाऱ्यांनी घेतली आहे.

महाराष्ट्र राज्य न्यायालयीन कर्मचारी महासंघ (गट-क), महाराष्ट्र स्टेट ज्युडिशियल स्टेनोग्राफर्स असोसिएशन, महाराष्ट्र राज्य न्यायालयीन बेलिफ कर्मचारी महासंघ आणि महाराष्ट्र राज्य न्यायालयीन गट-ड कर्मचारी महासंघ यांच्या संयुक्त विद्यमाने १७ नोव्हेंबरपासून या बेमुदत संपाला सुरुवात करण्यात आली आहे. उच्च न्यायालयाने मंजूर केलेल्या प्रस्तावानुसार सुधारित वेतनश्रेणी लागू करण्याची मागणी न्यायालयीन कर्मचाऱ्यांकडून सातत्याने केली जात आहे. मात्र, या प्रस्तावाची शासनाकडून अद्याप अंमलबजावणी झालेली नाही.

Dhiraj Deshmukh : लातूर जिल्हा बँकेवर पुन्हा 'देशमुख' पॅटर्नचीच सत्ता! १४ जागा जिंकत धीरज देशमुखांच्या 'सहकार पॅनेल'चा दणदणीत विजय!

त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी असून, अखेर त्यांनी संपाचे हत्यार उपसले आहे. बारामती तालुका न्यायालयातील कर्मचाऱ्यांनीही या आंदोलनात सहभाग नोंदवत उच्च न्यायालयाने मंजूर केलेल्या प्रस्तावाचा मान राखून सुधारित वेतनश्रेणी तातडीने लागू करण्याची मागणी केली आहे. मागणी मान्य होईपर्यंत संप सुरू ठेवण्याच्या भूमिकेमुळे या आंदोलनाकडे आता शासनाचे लक्ष वेधले गेले आहे. दरम्यान, संपाचा दुसरा दिवस सुरू असताना शासनाकडून याबाबत कोणता निर्णय घेतला जातो, तसेच संप किती काळ सुरू राहतो, याकडे न्यायालयीन कर्मचारी आणि दावेदारांचे लक्ष लागले आहे.

महत्त्वाच्या बातम्या

विशेष प्रतिनिधी
Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: bakhar Live