पुणे : श्रावण महिना आणि गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील साखर आणि गुळाच्या बाजारात मोठी उलाढाल अपेक्षित असताना, सरकारी उपायांमुळे दरांमध्ये मोठी घसरण पाहायला मिळत आहे. गेल्या महिनाभरात साखरेचे दर सत्तरीपार पोहोचले होते, ज्यामुळे गुळाचे भावही वधारले होते.
मात्र, आता साखरेपाठोपाठ गुळाच्या दरातही मोठी कपात झाली असून, ऐन सणासुदीच्या सर्वसामान्यांना दिलासा देणारी ही बातमी आहे.
Tukaram Mundhe: सोशल मीडियावरही तुकाराम मुंढेंचाच बोलबाला; बडे नेते अन् अधिकाऱ्यांनाही टाकले मागे!
गुळाच्या बाजारातील स्थिती:
पूर्वीचा दर: काही दिवसांपूर्वी गूळ ७,००० रुपये प्रति क्विंटल दराने विकला जात होता.
सध्याचा दर: बाजारातील घसरणीमुळे गूळ आता ५,४०० ते ५,८०० रुपये प्रति क्विंटल इतक्या खाली आला आहे.
फटका: ऐन श्रावणात प्रतिक्विंटलमागे १,६०० रुपयांनी बाजार कोसळल्याने उत्पादकांना मोठा आर्थिक फटका बसला असला तरी महागाईमुळे त्रस्त झालेल्या सर्वसामान्यांसाठी सणासुदीच्या काळात ही दिलासादायक बातमी आहे.
साखरेचे दर का घटले?
केंद्र सरकारने साठेबाजी रोखण्यासाठी आणि संभाव्य टंचाईवर नियंत्रण मिळवण्यासाठी तातडीने पावले उचलली आहेत.
साठा तपासणी: व्यापारी आणि साखर कारखान्यांच्या प्रत्यक्ष साठ्याची कसून तपासणी सुरू करण्यात आली आहे.
आयात निर्णय: केंद्र सरकारने १० लाख टन साखर आयातीचा निर्णय घेतला आहे.
या सर्व उपाययोजनांचा थेट परिणाम बाजारावर दिसून आला असून, गेल्या काही दिवसांत साखरेचे दर प्रति किलो १३ रुपयांनी कमी झाले आहेत. सध्या किरकोळ बाजारात साखर ५२ रुपयांवर आली असून, आगामी काळात हे दर आणखी कमी होण्याचा अंदाज साखर उद्योगातील तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.

