Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
Sunetra Pawar : चाकणच्या विकासासाठी सुनेत्रा पवारांचे आदेश, काय म्हणाल्या?

Sunetra Pawar : चाकणच्या विकासासाठी सुनेत्रा पवारांचे आदेश, काय म्हणाल्या?

बखर Live 3 weeks ago

पुणे: चाकण परिसरातील विविध समस्या सोडविण्यासाठी सर्व संबंधित शासकीय यंत्रणा आणि संस्थांनी समन्वयाने काम करावे. रस्ते, वाहतूक, पार्किंग, कचरा व्यवस्थापन आणि सुरक्षेसह अतिक्रमणांच्या प्रश्नांवर तातडीने कार्यवाही करावी, असे निर्देश उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी दिले आहेत.

(Sunetra Pawar)

FDA: गणेशोत्सव मंडळांनो लक्ष द्या; आता भंडाऱ्यासाठी 'हा' परवाना बंधनकारक; 'FDA'चा इशारा!

बुधवारी(27 ऑगस्ट) शासकीय विश्रामगृह येथे चाकणच्या विकासासाठी गठित उच्चस्तरीय समितीच्या बैठकीत कामकाजाचा आढावा घेण्यात आला, यावेळी सुनेत्रा पवार बोलत होत्या. बैठकीत त्यांनी संबंधित शासकीय विभागांनी समन्वयाने काम करून प्रलंबित प्रश्नांना कायमस्वरूपी तोडगा काढण्याची गरज व्यक्त केली. तसेच चाकण हे मोठे औद्योगिक केंद्र असून येथे देश-विदेशातून अनेक नागरिक येतात. यामुळे परिसरात स्वच्छता, सुरक्षा आणि पायाभूत सुविधा दर्जेदार असाव्यात, असे त्या म्हणाल्या. चाकण परिसरातील समस्या सोडवण्यासाठी सर्व संबंधित यंत्रणा एकाच व्यासपीठावर असणे ही सकारात्मक बाब असल्याचे सुनेत्रा पवारांनी म्हटले.

दरम्यान, चाकणमधील औद्योगिक विस्तार आणि वाहतुकीचे वाढते प्रमाण लक्षात घेता सुरक्षाव्यवस्था अधिक सक्षम करण्यात येणार आहेत. यासाठी पुढील आठवड्यापासून सुरक्षा दलाचे 100 अतिरिक्त जवान परिसरात तैनात केले जाणार आहेत. 31 ऑगस्टपर्यंत चाकण परिसरातील खड्डे बुडवण्याचे आणि साईडपट्ट्यांच्या दुरूस्तीचे निर्देश सुनेत्रा पवारांनी दिले.

'एमआयडीसी'तील पार्किंगची समस्या सोडवण्यासाठी जागा उपलब्ध करून देऊन रस्त्याच्या बाजूला उभे राहणारे ट्रक तेथे हलविण्याच्या सूचना दिल्या आहेत. गर्दीच्या वेळेत जड वाहनांवर निर्बंध आणण्यासोबतच औद्योगिक कंपन्यांच्या शिफ्टच्या वेळांमध्ये बदल करण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत.

चाकण परिसरातील अतिक्रमणांवरही कारवाई केली जाणार असून शुक्रवारपासून कामकाज सुरू करून महिनाभरात पूर्ण करण्याचे नियोजन आहे. तसेच 19 गावे आणि 'एमआयडीसी' क्षेत्रासाठी कचरा प्रक्रिया प्रकल्प उभारण्यात येत असून, प्लास्टिक कचऱ्याच्या समस्येवरही तातडीने उपाययोजना करण्यात येणार आहे.

विशेष प्रतिनिधी
Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: bakhar Live