मुंबई : 'नीट' पेपरफुटी प्रकरण आणि दिल्लीतील जंतरमंतरवर विद्यार्थ्यांवर झालेल्या दडपशाहीच्या निषेधार्थ ठाकरे बंधूंनी (उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे) एकत्र येत २६ जुलै रोजी (शुक्रवारी) मुंबईत महामोर्चाची घोषणा केली आहे.
या मोर्चात आता काँग्रेस पक्ष आणि महाविकास आघाडीचे इतर घटक पक्षही सहभागी होणार आहेत. Thackeray
काल (२३ जुलै) राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन या मोर्चाची घोषणा केली होती, आणि सर्व राजकीय पक्ष व पालकांना यात सहभागी होण्याचे आवाहन केले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत, काँग्रेस नेते हर्षवर्धन सपकाळ यांनी स्पष्ट केले की, "जर विद्यार्थ्यांच्या मुद्द्यावर सर्व पक्ष एकत्र येत असतील, तर आम्हाला त्यात सहभागी होण्यास कोणतीही हरकत नाही." या मोर्चाची रणनीती ठरवण्यासाठी आज महाविकास आघाडीची (मविआ) एक विशेष बैठक पार पडणार आहे.
त्यामुळे येत्या २६ जुलैला मुंबईच्या रस्त्यांवर राज ठाकरे, उद्धव ठाकरे यांच्यासोबतच काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे नेतेही एकाच मंचावर दिसणार आहेत.
या महामोर्चामध्ये मोठ्या संख्येने विद्यार्थी सहभागी होण्याची शक्यता आहे. दिल्लीतील जंतरमंतरवर विद्यार्थ्यांवर झालेल्या
या मोर्चाच्या पूर्वतयारीसाठी युवासेनेची एक महत्त्वाची ऑनलाइन बैठक झाली. यामध्ये शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी युवासेनेच्या पदाधिकाऱ्यांना स्पष्ट आदेश दिले आहेत. "मोर्चात सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांची पूर्ण काळजी घ्या. या मुलांवर पोलिसांची कोणतीही कारवाई होणार नाही, याची दक्षता घ्या. युवासेनेने विद्यार्थ्यांसाठी सुरक्षा कवच म्हणून मैदानात उतरावे," अशा सूचना त्यांनी दिल्या आहेत.
विशेष प्रतिनिधी
