Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story

'थोरातांचे सरकार येऊ दे'; जानकरांचे वक्तव्य चर्चेत

बखर Live 1 week ago

बारामती : रुई (ता. इंदापूर ) येथील बाबीर देवाच्या कलशारोहण सोहळ्यात माजी मंत्री तथा राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी "बाळासाहेब थोरात यांचे सरकार येऊ दे," असे साकडे बाबीर बुवाला घातले.

विशेष म्हणजे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या उपस्थितीत जानकरांनी केलेल्या या वक्तव्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले. या वक्तव्याबाबत नंतर माध्यमांशी बोलताना जानकरांनी त्यामागचा संदर्भ स्पष्ट केला. Jankar

माध्यमांशी बोलताना माजी मंत्री व राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर म्हणाले, रुई येथील बाबीर देवस्थानचे पुजारी पुणेकर महाराज हे बाबीर बुवाचे भक्त आहेत. त्यांनी बाबीर बुवाला बाळासाहेब थोरात यांचे चांगले दिवस यावेत, असे साकडे घातले होते. हाच धागा पकडून आपण आपल्या भाषणात "बाळासाहेब थोरात यांचे सरकार येऊ दे, बाळासाहेब थोरात आणि आमची सलगी आता आहे.

Devendra Fadnavis : 'गणेशोत्सव पर्यावरणपूरक पद्धतीने साजरा करण्याची जबाबदारी सर्वांचीच' : मुख्यमंत्री

जिथे आम्ही उभे राहतो, तिथे सरकार येते, हा माझा आत्मविश्वास आहे, असे जानकरांनी माध्यमांशी बोलताना मिश्किलपणे सांगितले. दरम्यान, माध्यमांशी बोलताना जानकरांनी आपल्या राजकीय भूमिकेवरही भाष्य केले. "आम्ही या सत्ताधाऱ्यांसोबत होतो; मात्र सत्ताधाऱ्यांनी आम्हाला हिसका दाखवला. त्यानंतर आम्ही मार्ग बदलला आहे. बळीराजा सुखी व्हावा आणि शाहू-फुले-आंबेडकरांचे सरकार यावे. आत्ताचे सरकार शाहू-फुले-आंबेडकरांचे नाही," असा दावाही त्यांनी केला.

बारामती माझी आई….

लोकसभा निवडणुकांची तयारी सुरू असल्याचे सांगत जानकरांनी विविध राज्यांमध्ये आपल्या आघाड्या असल्याचे स्पष्ट केले. बारामती ही आपली आई असल्याचे सांगताना त्यांनी बारामतीतून मिळालेल्या मोठ्या मतदानाची आठवणही करून दिली. पवारांसोबत पूर्वी राजकीय संघर्ष होता; मात्र आता जवळीक निर्माण होत असल्याचे त्यांनी नमूद केले. २०२९ मधील युती-आघाड्यांचे चित्र आताच सांगता येणार नसल्याचे सांगत जानकर म्हणाले की, सुप्रिया सुळे यांना बारामतीची जागा मिळाली तर आपण लढणार नाही; मात्र त्यांना ही जागा मिळाली नाही तर बारामतीतून आपण लढू, कारण बारामतीवर आपले प्रेम आहे.

महत्त्वाच्या बातम्या

विशेष प्रतिनिधी
Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: bakhar Live