मुंबई : Tukaram Mundhe महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासनाने आज 30 जुलै उच्च न्यायालयाच्या आवारात चालणाऱ्या तीन कॅन्टीन्सची अचानक तपासणी केली. या तपासणीदरम्यान, दोन कॅन्टीन्स फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड्स ऑथॉरिटी ऑफ इंडियाचा वैध परवाना नसताना चालवल्या जात असल्याचे आढळून आले.
परिणामी, एफडीएने या दोन्ही कॅन्टीन्सना त्वरित बंद करण्याच्या नोटिसा बजावल्या. तर तिसऱ्या कॅन्टीनकडे वैध परवाना असला तरी, स्वच्छता आणि अन्नसुरक्षा मानकांबाबतच्या अनेक त्रुटींमुळे त्यांना त्रुटी दूर करण्याबाबतची नोटीस बजावण्यात आली आहे.Tukaram Mundhe
समोर आलेल्या माहितीनुसार, उच्च न्यायालयाच्या संकुलात तीन स्वतंत्र कॅन्टीन्स चालतात. एक बॉम्बे बार असोसिएशनसाठी, एक ॲडव्होकेट्स असोसिएशन ऑफ वेस्टर्न इंडियासाठी आणि एक उच्च न्यायालयाच्या कर्मचाऱ्यांसाठी. एफडीए अधिकाऱ्यांनी या तिन्ही कॅन्टीन्सची आज सविस्तर तपासणी केली. तपासणीदरम्यान, दोन कॅन्टीन्सच्या चालकांना वैध FSSAI परवाने सादर करता आले नाहीत. अन्नसुरक्षा नियमांचे उल्लंघन झाल्याचे आढळल्याने, या दोन्ही कॅन्टीन्सना बंद करण्याच्या नोटिसा देण्यात आल्या. तसेच तिसऱ्या कॅन्टीनकडे आवश्यक परवाना होता. मात्र, तपासणीत स्वच्छता, देखभाल आणि अन्नसुरक्षा मानकांचे पालन करण्याबाबत अनेक त्रुटी आढळून आल्या. त्यामुळे एफडीएने चालकाला त्रुटी दूर करण्याची नोटीस बजावली असून, त्यांना ठराविक कालावधीत या त्रुटींचे निवारण करून आवश्यक सुधारणा करण्याचे निर्देश दिले आहेत.Tukaram Mundhe
विशेष म्हणजे, एका दिवसापूर्वीच म्हणजेच बुधवारी 29 जुलै मुंबई उच्च न्यायालयाने एफडीएच्या च्या कामकाजाबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली होती. अन्नसुरक्षेची तपासणी केवळ मोठी हॉटेल्स, रेस्टॉरंट्स आणि खाजगी खानावळींपुरतीच मर्यादित का असते? आणि सरकारी व निम-सरकारी कार्यालये, मंत्रालये व न्यायालयीन संकुलांमधील कॅन्टीन्सची नियमित तपासणी का केली जात नाही? असे प्रश्न उपस्थित केले होते. महत्त्वाचे म्हणजे न्यायालयाने एफडीएला राज्यभरातील सरकारी आणि निम-सरकारी कार्यालयांमधील कॅन्टीन्सची तपासणी करण्याचे, तपासणीचे व्हिडीओ रेकॉर्डिंग करण्याचे आणि न्यायालयाला अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले होते.
उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर, एफडीएने आज मुंबईसह राज्यभर विशेष तपासणी मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेचा भाग म्हणून, सर्वप्रथम उच्च न्यायालयाच्या आवारातील कॅन्टीन्सची तपासणी करण्यात आली. यापूर्वी, मुंबई जिल्हाधिकारी कार्यालयातील कॅन्टीनही वैध FSSAI परवान्याविना चालत असल्याचे आढळून आले होते, ज्यामुळे एफडीएने कामकाज थांबवण्याची नोटीस बजावली होती. एफडीए अधिकाऱ्यांच्या मते, ही मोहीम अशीच सुरू राहणार आहे. येत्या काही दिवसांत, मंत्रालये, सरकारी कार्यालये, न्यायालयीन संकुले आणि इतर निम-सरकारी संस्थांमधील उपहारगृहांची टप्प्याटप्प्याने तपासणी केली जाईल. जिथे कुठे अन्नसुरक्षा नियमांचे उल्लंघन झाल्याचे आढळेल, तिथे संबंधित चालकांविरुद्ध नियमांनुसार कारवाई केली जाईल.

