पुणे: पुण्यातील गणेशोत्सवात डीजे, कर्णकर्कश ध्वनिक्षेपक आणि लेझरच्या वापराविरोधात सुरू झालेला संघर्ष आता पोलीस तक्रारी पर्यंत पोहोचला आहे. पुण्यातील शिक्षणतज्ज्ञ धनंजय कुलकर्णी यांनी विद्यानंद बापट यांच्यावर अराजकवादी आणि 'नक्षली मानसिकते'चे असल्याचा आरोप केला आहे.
धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी बापट यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणीही त्यांनी केली असून, पोलिसांकडे अधिकृत तक्रार करण्याची तयारी दर्शवली आहे. Vidyanand Bapat
गणेशोत्सव २०२६ च्या पूर्वतयारीसाठी पुणे महानगरपालिकेत डीजे आणि कर्णकर्कश ध्वनिक्षेपकांविरोधात पुण्यातील सजग नागरीक विद्यानंद बापट यांनी आवाज उठवला. त्यांच्या या भूमिकेला विरोध करत गणेश मंडळातील कार्यकर्त्यांनी त्यांना बाहेरचा रस्ता दाखवला. बैठकीत जोरदार खडाजंगी झाली. या घारंechs व्हिडिओ सोशल मीडियावर आल्यानंतर विद्यानंद बापट सध्या चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहेत.
शशांक महाजन यांनीही बापट यांनी केवळ डीजे आणि ध्वनीप्रदूषणाच्या मुद्द्यावर बोलावे, पुण्याच्या गणेशोत्सवाच्या परंपरेला लक्ष्य करू नये, अशी भूमिका घेतली आहे.
दरम्यान, ध्वनीप्रदूषणाविरोधातील या लढ्याला डेक्कन जिमखाना परिसरातील रहिवासी शरद केळकर यांचीही साथ मिळाली आहे. केळकर यांनी गणेशोत्सवातील उच्च क्षमतेचे डीजे, ध्वनिक्षेपक आणि कथित नियमभंगाबाबत थेट राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाकडे (NHRC) तक्रार केली.
नागरिकांच्या आरोग्य आणि मूलभूत अधिकारांवर परिणाम होत असल्याचा मुद्दा त्यांनी उपस्थित केला. या तक्रारीची दखल घेत आयोगाने महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाला (MPCB) नोटीस बजावून प्रकरणात केलेल्या कारवाईचा अहवाल सादर करण्याचे निर्देश दिल्याने या वादाला आता प्रशासकीय आणि कायदेशीर स्वरूप आले आहे.
Pune Municipal Corporation : पुणे महापालिकेतील भाजप-राष्ट्रवादीचा वाद मिटला; वरिष्ठ नेत्यांच्या हस्तक्षेपाने राजकीय तणाव संपला
पुणे पोलिसांनीही यंदाच्या गणेशोत्सवासाठी ध्वनिक्षेपकांबाबत कठोर भूमिका घेतली आहे. पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी 'प्रेशर मिड' आणि 'प्लाझ्मा साउंड'सारख्या उच्च क्षमतेच्या उपकरणांवर बंदी घालण्याचा इशारा दिला असून, नियम मोडणाऱ्या मंडळांवर गुन्हे दाखल करून ध्वनिक्षेपक यंत्रणा जप्त केली जाऊ शकते, असे स्पष्ट केले आहे.
गणेश मंडळांना निश्चित मर्यादेतच बास आणि टॉप वापरण्याची परवानगी राहणार असून, छुप्या पद्धतीने अतिरिक्त यंत्रणा लावल्यास पोलिसांकडून प्रत्यक्ष तपासणी आणि कारवाई केली जाणार आहे.
पुणे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी गणेशोत्सव आणि विसर्जन मिरवणुकांमध्ये लेझर झोतांच्या वापरावर निर्बंध घातले आहेत. तीव्र लेझरमुळे नागरिकांच्या डोळ्यांना इजा होण्याचा धोका असल्याने नियम मोडणाऱ्या व्यक्ती, संस्था किंवा गणेश मंडळांवर कायदेशीर कारवाई करण्याचा इशाराही प्रशासनाने दिला आहे.

