Tuesday, 22 Sep, 9.19 am BBC मराठी

होम
भिवंडी इमारत दुर्घटना: 18 जणांचा मृत्यू, तर 20 जणांना सुखरूप बाहेर काढण्यात यश

ठाणे जिल्ह्यातील भिवंडी येथे 21 सप्टेंबर रोजी पहाटे तीन मजली इमारत कोसळली. या दुर्घटनेत आतापर्यंत एकूण 18 जणांचा मृत्यू झाला आहे, तर 20 जणांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आलं आहे.

अजूनही काहीजण इमारतीच्या ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे.

अडकून पडलेल्या लोकांना काढण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे. NDRF कडून बचावकार्य सुरू आहे.

यावेळी NDRF च्या टीमने चिमुकल्याला दुर्घटनाग्रस्त इमारतीतून सुखरूप बाहेर काढलं.

आतापर्यंत सुखरूप बाहेर काढण्यात आलेल्या व्यक्तींची नावं पुढीलप्रमाणे:

 1. हेदर सलमानी( पु/२०वर्ष)
 2. रुकसार खुरेशी(स्त्री/२६ वर्ष)
 3. मोहम्मद अली(पु/६० वर्ष)
 4. शबीर खुरेशी(पु/३० वर्ष)
 5. मोमीन शमीऊहा शेख (स्त्री/४५ वर्ष)
 6. कैसर सिराज शेख (स्त्री/२७ वर्ष)
 7. रुकसार जुबेर शेख ( स्त्री/ २५वर्ष)
 8. अबुसाद सरोजुद्दीन अन्सारी (पु/१८ वर्ष)
 9. आवेश सरोजुद्दीन अन्सारी (पु/२२ वर्ष)
 10. जुलेखा अली शेख (स्त्री/५२ वर्ष)
 11. उमेद जुबेर कुरेशी (पु/४वर्ष)
 12. आमीर मुबिन शेख (पु/१८ वर्ष)
 13. आलम अन्सारी (पु/१६ वर्ष)

मृत व्यक्तीची नावे पुढीलप्रमाणे:

 1. झुबेर खुरेशी(पु/३० वर्ष)
 2. फायजा खुरेशी(पु/५वर्ष)
 3. आयशा खुरेशी(स्री/७वर्ष)
 4. बब्बू(पु/२७वर्ष)
 5. फातमा जुबेर बबु (स्त्री/२वर्ष)
 6. फातमा जुबेर कुरेशी (स्त्री/८वर्ष)
 7. उजेब जुबेर (पु/६ वर्ष)
 8. असका आबिद अन्सारी (पु/१४ वर्ष)
 9. अन्सारी दानिश अलिद (पु/१२ वर्ष)
 10. सिराज अहमद शेख (पु/२८ वर्ष)

ठाण्याचे पालकमंत्री आणि महाराष्ट्राचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे हे दुर्घटनास्थळाची पाहणी केली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भिवंडी इमारत दुर्घटनेबाबत काळजी व्यक्त केली. तसंच, दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबीयांप्रती सहवेदना व्यक्त केली.

भिवंडी येथील इमारत दुर्घटनेबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दुःख व्यक्त केलं असून मृतांच्या कुटुंबीयांप्रती सहवेदना प्रकट केल्या आहेत.

मुख्यमंत्री ठाकरे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी देखील बोलले असून बचाव कार्य व्यवस्थित व काळजीपूर्वक पार पाडण्याचे तसेच जखमींवर योग्य उपचार करण्याचे निर्देश त्यांनी प्रशासनाला दिले आहेत.

(ही बातमी सातत्यानं अपडेट होत आहे...)

source: bbc.com/marathi

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: BBC Marathi
Top