Tuesday, 09 Feb, 4.54 pm BBC मराठी

होम
बीबीसी इंडियन स्पोर्ट्स वुमन ऑफ द इयर- कोण आहेत यंदाचे ज्युरी?

बीबीसी न्यूजच्या 'इंडियन स्पोर्ट्सवुमन ऑफ द इयर' पुरस्काराचं (BBC ISWOTY) वितरण या वर्षीही केलं जाणार आहे. या पुरस्कारासाठी यावर्षी निवड करण्यात आलेल्या पाच नामांकनांची घोषणा करण्यात आली आहे.द्युती चंद (अॅथलेटिक्स), कोनेरू हंपी (बुद्धिबळ), मनू भाकेर (नेमबाजी-एअरगन शूटिंग), रानी (हॉकी), विनेश फोगाट (कुस्ती-फ्रीस्टाईल रेसलिंग) या पाच खेळाडूंची निवड ज्येष्ठ क्रीडा पत्रकार, क्रीडा क्षेत्रातले तज्ज्ञ आणि बीबीसीच्या संपादकांनी केली आहे.

पुरस्कारासाठी तुम्ही मतदान करू शकता. बीबीसीच्या भारतीय भाषा सेवांचे प्लॅटफॉर्म किंवा बीबीसी स्पोर्ट्स वेबसाईटवर जाऊन आपल्या आवडत्या भारतीय महिला खेळाडूसाठी 24 फेब्रुवारीपर्यंत मतदान करू शकता.विजेता खेळाडूच्या नावाची घोषणा 8 मार्च 2021 रोजी व्हर्च्युअल कार्यक्रमाच्या माध्यमातून केली जाणार आहे.

source: bbc.com/marathi

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: BBC Marathi
Top