Thursday, 18 Mar, 10.51 am BBC मराठी

होम
गीता फोगाटची बहीण रितिकाची आत्महत्या

महत्त्वाची सूचना

औषधोपचार आणि थेरपीच्या मदतीने मानसिक आजारांवर उपचार शक्य आहेत. यासाठी तुम्ही मानसोपचारतज्ज्ञांची मदत घेणं गरजेचं आहे. तुम्हाला किंवा एखाद्या परिचित व्यक्तीमध्ये अशा प्रकारच्या मानसिक आजारांची लक्षणं दिसल्यास या हेल्पलाईन नंबरवर संपर्क साधून मदत मिळवू शकता.

  • सामाजिक न्याय आणि सशक्तीकरण मंत्रालय -1800-599-0019 (13 भाषांमध्ये उपलब्ध)
  • इंस्टिट्यूट ऑफ ह्यूमन बिहेवियर अँड एलाइड सायन्सेस - 9868396824, 9868396841, 011-22574820
  • नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ मेंटल हेल्थ अँड न्यूरोसायन्स - 080 - 26995000
  • विद्यासागर इंस्टिट्यूट ऑफ मेंटल हेल्थ अँड एलाइड सायन्सेस, 24X7 हेल्पलाइन-011 2980 2980

कुस्तीचा सामना हरल्यानंतर फोगाट भगिनींची मामेबहीण रितिका हिने आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे.

सोमवारी (15 मार्च) बलाली गावात तिने कथितरित्या गळफास लावून आत्महत्या केली, अशी माहिती पोलीस उपअधीक्षक राम सिंग बिष्णोई यांनी दिली.

रितिका ही बबीता, गीता या फोगाट भगिनींची मामेबहीण होती. ती 17 वर्षांची होती.

रितिकाने 12 ते 14 मार्चदरम्यान राजस्थानमधील भरतपूर येथील लोहागड स्टेडियमवर आयोजित राज्यस्तरीय सब ज्युनियर, कनिष्ठ महिला आणि पुरुष कुस्ती स्पर्धेत भाग घेतला होता.

अंतिम सामना 14 मार्च रोजी खेळविण्यात आला होता, त्यामध्ये रितिका एका सामन्यात पराभूत झाली. या पराभवानंतर तिला हादरा बसला आणि त्यानंतर 15 मार्च रोजी रात्री 11 वाजताच्या सुमारास बलाली गावच्या घरात पंख्याला स्कार्फ लावून आत्महत्या केली, अशी माहिती माध्यमांमधील बातम्यांमधून समोर येत आहे.

झुंझुनू जिल्ह्यातील जैतपूर हे रितिकाचं मूळ गाव होतं.

रितिका पैलवान महावीर फोगाट या कुस्ती अ‍ॅकॅडमीमध्ये गेल्या 5 वर्षांपासून सराव करत होती.

तिने यापूर्वी 4 वेळा राज्यस्तरीय स्पर्धेत भाग घेतला होता.

नुकत्याच झालेल्या स्पर्धेर 53 किलो वजनी गटात ती सहभागी झाली होती.

पण यामध्ये झालेल्या पराभवाने रितिकाला मानसिक धक्का बसला होता, असं सांगितलं जात आहे.

वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)

source: bbc.com/marathi

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: BBC Marathi
Top