Saturday, 19 Sep, 7.29 am BBC मराठी

होम
IPL 2020 : मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स, अबू धाबीत रंगणार सलामीची लढत

इंडियन प्रीमियर लीग अर्थात IPL च्या तेराव्या हंगामाला आजपासून (19 सप्टेंबर) सुरुवात होणार आहे. मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स अशी सलामीची लढत असेल.

संयुक्त अरब अमिराती (UAE) ची राजधानी अबू धाबी इथे भारतीय वेळेनुसार संध्याकाळी साडेसात वाजता पहिला सामना सुरू होईल.

IPL चं वेळपात्रक आणि गुणतालिका :

गुणतालिका :

10 नोव्हेंबरला अंतिम सामना

IPL 2020 चा 13 वा हंगाम 19 सप्टेंबरपासून संयुक्त अरब अमिराती म्हणजेच (UAE) मध्ये सुरू होणार आहे. ही स्पर्धा 10 नोव्हेंबपर्यंत चालेल. कोव्हिड-19 उद्रेकामुळे ही स्पर्धा मार्चऐवजी सप्टेंबरमध्ये होत आहे.

IPL च्या नव्या वेळापत्रकानुसार, 19 सप्टेंबरला मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपरकिंग्स दरम्यान पहिली मॅच होणार आहे. त्यानंतर 6 नोव्हेंबपर्यंत प्रत्येक संघाचे एकमेकांबरोबर सामने होतील.

उपांत्यपूर्व फेरीतले सामने झाल्यानंतर 10 नोव्हेंबरला अंतिम सामना रंगेल. प्राथमिक फेरीपासून अंतिम सामन्यापर्यंत सगळ्या सामन्यांची वेळी ही भारतीय प्रमाणवेळेनुसार संध्याकाळी 7.30 वाजताची असेल.

source: bbc.com/marathi

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: BBC Marathi
Top