Thursday, 08 Apr, 2.25 pm BBC मराठी

होम
कोरोना लस : लशीकरणानंतर रक्ताच्या गाठी, ब्रिटनमध्ये 30 वर्षांखालील तरुणांना अॅस्ट्राझेनिका लस नाही

ब्रिटनमध्ये 30 वर्षांखालील तरुणांना अॅस्ट्राझेनिका लस देण्यात येऊ नये, त्याऐवजी त्यांना पर्यायी लस देण्यात यावी, असं औषधांचं नियमन करणाऱ्या MHRA संस्थेने म्हटलं आहे.

अॅस्ट्राझेनिका कंपनीची लस घेतल्यानंतर काही जणांमध्ये ब्लड क्लॉटिंग (रक्ताच्या गाठी) बनत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्यामुळे MHRA संस्थेने ही सूचना केली आहे.

मार्च महिनाअखेरपर्यंत युकेमध्ये करण्यात आलेल्या लशीकरणाचा MHRA ने अभ्यास केला.

अॅस्ट्राझेनिका लस देण्यात आलेल्या 79 लोकांमध्ये रक्ताच्या गाठी बनल्याचं त्यामध्ये निदर्शनास आलं. त्यापैकी 19 जणांचा लशीकरणानंतर मृत्यू झाला होता.

तथापि, अॅस्ट्राझेनिका लशीमुळेच या लोकांच्या शरीरात रक्ताच्या गाठी बनल्याचे सबळ पुरावे उपलब्ध नाहीत, असंही MHRA ने म्हटलं आहे.

पण, दुसरीकडे रक्ताच्या गाठी आणि लसीकरण यांच्यात काही संबंध आहे का, याचाही तपास करण्यात येत आहे.

ऑक्सफर्ड-अॅस्ट्राझेनिका लशीचे दुष्परिणाम अत्यंत दुर्मिळ आहेत. तसंच लशीच्या परिणामकारकतेत कोणतीच कमतरता नाही, असंही MHRA संस्थेने म्हटलं आहे.

MHRA ची सूचना

MHRA ने दिलेल्या माहितीनुसार, बहुतांश लोकांसाठी ही लस फायदेशीर असणार आहे.

तसंच ज्या लोकांनी पहिला डोस घेतला आहे, त्यांनी दुसरा डोस घेतला पाहिजे, असंही MHRA ने म्हटलं.

पण ज्यांना रक्ताच्या गाठी बनण्याच्या समस्या उद्धवल्या, त्यांनी दुसरा डोस घेऊ नये, असं संस्थेने सांगितलं आहे.

MHRA संस्थेने हा अहवाल दिल्यानंतर JCVE या सरकारच्या सल्लागार संस्थेनेही याबाबत पावले उचलली.

सरकारने 18 ते 29 वयाच्या तरुणांना अॅस्ट्राझेनिकाऐवजी इतर कोणती तरी लस द्यावी, अशी सूचना JCVE संस्थेने केली आहे.

वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)

source: bbc.com/marathi

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: BBC Marathi
Top