होम
कोरोना व्हायरस आकडेवारी : मुंबई, पुणे, महाराष्ट्रात कोरोनाचे आज किती रुग्ण?

महाराष्ट्रात सोमवारी (19 एप्रिल) कोरोनाचे 58 हजार 924 नवे रुग्ण आढळले, तर 351 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला.
महाराष्ट्रात कोरोना व्हायरसची लागण झालेल्या अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या सध्या 6,76,520 वर गेली आहे.
सोमवारी (19 एप्रिल) मुंबई मनपा क्षेत्रात 7381, ठाणे मनपा क्षेत्रात 1200, पुणे मनपा क्षेत्रात 4616, तर नागपूर मनपा क्षेत्रात 5086 रुग्ण आढळले.
महाराष्ट्रात 19 एप्रिलला 52 हजार 412 रुग्ण बरे होऊन घरी परतले. राज्याचा रिकव्हरी रेट 81.04 % आहे.
आज नोंदवण्यात आलेल्या 503 मृत्यूंपैकी 220 मृत्यू गेल्या 48 तासांमधले आहेत. बाकीचे मृत्यू हे त्या आधीच्या दिवसांमधील आहेत.
जिल्हा - महापालिका निहाय दैनंदिन रुग्णसंख्या
महाराष्ट्रातल्या जिल्हयांतली रुग्णसंख्या
महाराष्ट्रातील आकडेवारी

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)
source: bbc.com/marathi