Sunday, 22 Sep, 4.33 am BBC मराठी

होम
फादर फ्रान्सिस दिब्रिटो: 93व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष

उस्मानाबादमध्ये होणाऱ्या आगामी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिक फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांची निवड करण्यात आली आहे. औरंगाबादमध्ये साहित्य महामंडळाची बैठक झाली. यामध्ये फादर दिब्रिटो यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलं.

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन मराठवाड्यातील उस्मानाबादेत होत असल्यामुळे याच भागातील साहित्यिकाची अध्यक्षपदी निवड होईल अशी चर्चा होती. निवृत्त न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर, कवि ना. धों. महानोर, साहित्यिक सुधीर रसाळ तसंच रा. रं बोराडे यांची नावं या पदासाठी चर्चेत होती.

पण अखेरीस फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांनी निवड करण्यात आली आहे.

कोण आहेत फादर फ्रान्सिस दिब्रिटो

फादर दिब्रिटो यांना जन्म पालघर जिल्ह्यातील वसई तालुक्यात नंदाखाल गावात 4 डिसेंबर 1942 ला झाला. त्यांचं शिक्षण नंदाखालमध्येच सेंट जोसेफ मराठी हायस्कूलमध्ये झालं. त्यांनी पुणे विद्यापीठातून समाजशास्त्रात बी. ए. तर धर्मशास्त्रात एम. ए. पूर्ण केलं.

1972 मध्ये त्यांनी कॅथलिक धर्मगुरू म्हणून दीक्षा घेतली. 1983 ते 2007 या कालावधीत ते मराठी कॅथलिक समाजाशी संबंधित असलेल्या 'सुवार्ता' या मासिकाचे संपादक होते. या वृत्तपत्राच्या माध्यमातून त्यांनी समाजप्रबोधनासाठी महत्त्वाचं कार्य केलं.

त्यांनी पर्यावरण, गुंडगिरी तसंच सामाजिक प्रश्नांविरूद्ध आवाज उठवला. तसंच त्यांनी राजकारणातील गुन्हेगारीविरुद्ध टोकदार लिखाण केलं.

फादर दिब्रिटो यांची साहित्यसंपदा

1. आनंदाचे तरंग : मदर टेरेसा

2. ओअसिसच्या शोधात

3. तेजाची पाऊले

4. नाही मी एकला

5. संघर्षयात्रा ख्रिस्तभूमीची

6. सुबोध बायबल

7. सृजनाचा मळा

8. परिवर्तनासाठी धर्म

9. ख्रिस्ताची गोष्ट

10. मुलांचे बायबल

11. ख्रिस्ती सण आणि उत्सव

12. पोप जॉन पॉल दुसरे

13. गोतावळा

14. गिदीअन

15. सृजनाचा मोहोर

source: bbc.com/marathi

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: BBC Marathi
Top