Dailyhunt
ट्रम्प यांनी इराणसाठी वापरले अपशब्द, होर्मुझ सामुद्रधुनी खुली नाही केली तर दिला 'हा' इशारा

ट्रम्प यांनी इराणसाठी वापरले अपशब्द, होर्मुझ सामुद्रधुनी खुली नाही केली तर दिला 'हा' इशारा

Getty Images

मंगळवारपर्यंत जर होर्मुझ खुले केले नाही तर त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील असे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले आहे.

ट्रूथ सोशलवर लिहिलेल्या पोस्ट मध्ये त्यांनी इराणला होर्मुझची सामुद्रधुनी मंगळवारपर्यंत (7 एप्रिल) खुली करावी अन्यथा इराणमधील ऊर्जा स्रोत आणि पूल उद्ध्वस्त केले जातील असे डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले आहे.

त्यांनी वापरलेल्या या अर्वाच्य शब्दांमुळे त्यांच्यावर टीका होत आहे. ट्रम्प यांच्या पोस्टनंतर अमेरिकेतील न्यूयॉर्कचे डेमोक्रॅटिक पक्षाचे खासदार चक शुमर यांनी ट्रम्प यांच्यावर कठोर शब्दांत टीका केली आहे.

ट्रम्प यांच्या या वक्तव्यावर थायलंडमधील इराणच्या दूतावासातून प्रतिक्रिया आली आहे. इराणने म्हटले आहे की "अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष किशोरवयीनांप्रमाणे शिवीगाळ करत आहेत हे पाहून असं वाटतंय की अमेरिका अपेक्षेच्या आधीच पाषाणयुगात पोहोचले आहे."

चक शुमर यांनी आपल्या सोशल मीडिया पोस्टमध्ये ईस्टरच्या शुभेच्छा दिल्या. ते म्हणाले, "जेव्हा आपण आपल्या मित्र परिवार आणि कुटुंबीयांसोबत चर्चला जात आहोत, उत्सव साजरा करत आहोत. त्याचवेळी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष सोशल मीडियावर अनियंत्रित पागल व्यक्तीप्रमाणे बडबडत आहेत."

चक शुमर म्हणाले, "ट्रम्प हे हल्ल्यांची धमकी देत आहेत आणि आपल्या सहकाऱ्यांना नाराज करत आहेत. ट्रम्प तसेच आहेत पण आम्ही मात्र तसे नाही." अमेरिका याहून चांगल्या गोष्टींसाठी निश्चितच पात्र आहे.

 BBC

सिनेटर लिंडसे ग्राहम हे ट्रम्प यांच्या समर्थनार्थ लिहितात, जसं की आपण गेल्या काही दिवसांपासून पाहत आहोत राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे होर्मुझ सामुद्रधुनी खुली करण्याचा कसोशीने प्रयत्न करत आहेत. इराणला दिल्या गेलेल्या इशाऱ्याबाबत ते खूप गंभीर आहेत.

लिंडसे पुढे म्हणतात, मला अजून विश्वास आहे की होर्मुझ सामुद्रधुनी अजून खुली होऊ शकते. त्यांच्याकडे असलेल्या युरेनियम साठ्याला मुत्सद्देगिरीच्या माध्यमातून संरक्षित केले जाऊ शकते. यामुळे या प्रदेशावर आणि जगावर चांगला परिणाम होईल. मुत्सद्देगिरीची वेळ हातातून निघून गेली आहे असा विचार करणे म्हणजे खऱ्या परिस्थितीकडे कानाडोळा करणे आहे. इराणसाठी माझा संदेश आहे की समजूतदारपणे काम करा आणि लवकर निर्णय घ्या.

अमेरिकन काँग्रेसच्या माजी सदस्य मार्जोरी टेलर लिहितात "ईस्टरच्या सकाळी राष्ट्रपतींनी ही पोस्ट केली आहे."

त्यांच्या प्रशासनातील प्रत्येक व्यक्तीने जी व्यक्ती स्वतःला ख्रिश्चन समजते त्यांनी गुडघ्यावर बसून ईश्वराची माफी मागितली पाहिजे. त्यांनी राष्ट्राध्यक्षांचा उदो-उदो करणे बंद केले पाहिजे आणि त्यांचे पागलपण पाहिले पाहिजे. मी तुम्हाला आणि त्यांना ओळखते. ते पागल झाले आहेत आणि तुम्ही देखील त्यात सहभागी आहात.

"मी इराणची बाजू घेत नाहीये पण सर्वांसोबत प्रामाणिक राहूया. होर्मुझ सामुद्रधुनी यामुळे बंद झाली की कोणतेही आक्रमण किंवा हालचाल न होता देखील अमेरिका आणि इस्रायलने इराणविरोधात युद्ध सुरू केले. इराण कोणत्याही क्षणी अण्वस्त्र बनवू शकतं ही असत्य गोष्ट अनेक दशकांपासून बोलली जात आहे, त्याच मुद्द्यावर हे युद्ध सुरू करण्यात आले."

 BBC

ट्रम्प यांच्या विधानावर म्हटले आहे की, ट्रम्प यांचा असंतुलित व्यवहार आणि सरकारी उच्चस्तरीय पदाला सांभाळण्याची त्यांची असमर्थता पाहून त्यांच्यावर महाभियोग चालवून त्यांना हटवण्यात यावे.

ट्रम्प यांच्या विधानावर राष्ट्रीय जनता दलाचे खासदार

यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणतात, प्रिय अमेरिकन लोकांनो तुम्ही तुमच्यासोबत हे काय करुन घेतलं. या प्रकारच्या भाषा ही तुम्हाला खरंच पटते का? जेव्हा इराण आणि होर्मुझ सामुद्रधुनीच्या बाबतीतील वक्तव्य केवळ तमाशा बनून राहतात तेव्हा हे शक्तीचे प्रदर्शन नाही तर आपल्या जबाबदारीपासून गपचूप पळ काढण्यासारखे आहे.

 Getty Images

मनोज झा सांगतात, "राजकारण आपल्या सुधारित रूपात एक नैतिक संवाद आहे. जो संयम, तर्क आणि जबाबदारीवर चालतो. पण जेव्हा हा केवळ एक दिखावा बनतो तेव्हा निव्वळ गोंधळ बनून राहतो."

"तेव्हा, प्रश्न हा एका व्यक्तीपुरता मर्यादित राहत नाही. हा प्रश्न लोकशाहीचा बनतो. आपण आपल्या सामूहिक समजूतदारपणातून कुणाला स्वीकारतो आणि कोणत्या गोष्टीला सामान्य समजण्याची आपण निवड करतो. आमची गत पण काही वेगळी नाहीये."

इराणवर अमेरिका आणि इस्रायलकडून झालेल्या हल्ल्यानंतर राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी आपले वक्तव्ये अनेकवेळा बदलली आहेत. युद्धाच्या सुरुवातीच्या काळातच युद्ध जिंकल्याचा दावा करण्यापासून ते इराणला झालेल्या नुकसानाबाबत त्यांनी अनेक वेळा आपली विधानं बदलली आहेत.

कधी ते इराणला पाच दिवसांची मुदत देतात तर कधी ती वाढवून 10 दिवसांची करतात. इराणची अण्वस्त्र क्षमता नष्ट करण्यापासून ते होर्मुझ सामुद्रधुनीबाबत ट्रम्प यांनी अनेकवेळा आपले विधान बदलले आहे. त्यांच्या स्वतःच्या वक्तव्यातच विरोधाभास दिसून येतो.

इराण युद्धाबाबत ट्रम्प यांनी नेटो सहकाऱ्यांबद्दल ही अनेकवेळा आपली नाराजी दर्शवली आहे.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)

ट्रम्प Getty Images

source: bbc.com/marathi

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: BBC Marathi