Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
आरोग्य विभागाचा नोडल अधिकारी डॉ. मडावींनी घेतला आढावा

आरोग्य विभागाचा नोडल अधिकारी डॉ. मडावींनी घेतला आढावा

गोंदिया ता. 12- के.टी. एस. सामान्य रुग्णालयातील सभागृहात मुंबई येथील उपसंचालक तथा जिल्ह्याचे राज्य नोडल अधिकारी डॉ. पुरुषोत्तम महावी यांचे अध्यक्षतेत व नागपूर विभागीय उपसंचालक डॉ. शशिकांत शंभरकर यांच्या उपस्थितीत जिल्हास्तरीय आरोग्यविषयक आढावा सभा (ता.

१०) रोजी पार पडली.
जिल्हास्तरिय आढावा सभेत जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. पुरुषोत्तम पटले. सहायक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अरविंद कुमार वाघमारे, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. तृप्ती कटरे, सहाय्यक संचालक कुष्ठरोग डॉ. महेंद्र धनविजय, जिल्हा माता व बाल संगोपन अधिकारी डॉ. रोशन राऊत, जिल्हा साथरोग अधिकारी डॉ. निरंजन अग्रवाल, विभागीय कार्यक्रम व्यवस्थापक मनिष नंदनवार, जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. विनोद चव्हाण उपस्थित होते. राज्य नोडल अधिकारी डॉ. पुरुषोत्तम मडावी व नागपूर विभागीय उपसंचालक डॉ. शशिकांत शंभरकर यांनी गोंदिया जिल्ह्यातील राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमाचा विस्तृत आढावा घेतला. त्यावेळेस जिल्ह्यातील सर्व तालुका आरोग्य अधिकारी, बाई गंगाबाई स्त्री रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय व सर्व ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक, प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी, राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रम योजनाचे जिल्हा समन्वयंक यांचा आढावा घेवुन मार्गदर्शन केले. आढावा सभेमुळे जिल्ह्यातील तळागाळातील लोकांना गुणवत्तापूर्ण आरोग्य सेवा देण्याच्या दृष्टीने नियोजन मार्गदर्शन करण्यात आले.
आढावा सभेदरम्यान सर्व राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रम जसे माता व बाल संगोपन, हिवताप, क्षयरोग, कुष्ठरोग, सिकलसेल, किटकजन्य आजार, हत्तीपाय रोग, अॅनिमिया मुक्त भारत अभियान, संस्थात्मक प्रसुती, नियमित लसीकरण, कुपोषण, नवसंजीवनी योजना, साथरोग, जननी सुरक्षा योजना, प्रधानमंत्री टी. बी. मुक्त भारत अभियान, जननी शिशु सुरक्षा कार्यक्रम, बाल सुरक्षा कार्यक्रम, कायाकल्प, प्रधानमंत्री जन आरोग्य योजना, आरोग्यवर्थिनी उपकेंद्र योजना, बांधकाम, १५ वित्तबाबी, आयुष, एनसीडी, कर्करोग तपासणी मोहिम, एच. पी. व्ही. लसीकरण, माझं गाव आरोग्य संपन्न गाव, यु. व्ही. न. लसीकरण पोर्टल, गुणवत्ता आश्वासन, जीवनविषयक आकडेवारी, ई संजीवनी, टेलीकन्सल्टेशन, पॅलेटिव्ह केअर, स्टेमी प्रकल्प ई. विविध बाबींचा आढावा घेवुन मार्गदर्शक सुचना देण्यात आल्या. जिल्ह्यात मातांना प्रसुतीपुर्व व प्रसुतीपस्चात आरोग्य सेवा देवुन सर्व आरोग्य कार्यक्रमाचे उद्दिष्ट पुर्ण करणे तसेच लोकांना गुणात्मक सेवा, जिल्ह्यातील वय १४ ते १५ वर्ष वयोगटातील मुलींना गर्भाशय कर्करोग प्रतिबंधात्मक लसीकरण करून भविष्यात होणार्या आजारापासुन सुरक्षा प्रदान करणे, ग्रामीण रुग्णालयामध्ये बेड ऑक्युपन्सी रेट
वाढविणे, दोन कोटी महिलांची तपासणी करण्याच्या सुचना राज्य नोडल अधिकारी डॉ. पुरुषोत्तम मडावी यांनी आरोग्य विभागाला यावेळी दिल्या. आढावा सभेत जिल्हा माध्यम विस्तार अधिकारी विजय आखाडे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संगीता भोयर, डॉ. ललित कुकडे, डॉ. निलेश जाधव, डॉ. स्वप्नील आत्राम, डॉ. सुकन्या कांबळे, डॉ. प्रणित पाटील तसेच वैद्यकीय अधिक्षक डॉ. संजय माहुले, डॉ. खुशबु महानंदीया, डॉ. नंदा गेडाम, डॉ. विजय पटले. डॉ. प्रशांत तुरकर, डॉ. राहुल शेंडे, डॉ. सचिन उईके, डॉ. गगन गुप्ता, डॉ. आशिश नाईक, डॉ. राऊत, डॉ. निकीता पोयाम, डॉ. गुरुप्रकाश खोब्रागडे, डॉ. वेदप्रकाश चौरागडे, डॉ. भारती जयस्वाल, अर्चना वानखेडे, उखादास बिसेन, मनिष मदने यांचेसह के. टी. एस. सामान्य रुग्णालय, बाई गंगाबाई स्त्री रुग्णालय, जिल्हा परिषद आरोग्य विभाग व राष्ट्रीय आरोग्य अभियानाचे कार्यक्रम समन्वयक उपस्थित होते.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: BERAR TIMES